‘जनता दरबाराचे सोमवारीआयोजन’तक्रारींच्या निराकरणासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे

‘जनता दरबाराचे सोमवारीआयोजन’तक्रारींच्या निराकरणासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे

‘जनता दरबाराचे सोमवारीआयोजन’
तक्रारींच्या निराकरणासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे

  कोल्हापूर, दि. 2 (ज) : वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिन अंतर्गत ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपले प्रश्न, अर्ज, निवेदन व अडचणी सोडविण्यासाठी जनता दरबारात उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे. आपल्या समस्यांविषयी लेखी अर्ज सोबत आणणे आवश्यक आहे.

    बैठकीसाठी जिल्हाधिकारी, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, महसूल विभागाचे सर्व विभाग प्रमुख, सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता,  सहायक आयुक्त समाज कल्याण, सहायक संचालक नगररचना, सहायक आयुक्त अन्न, औषध प्रशासन विभाग अशा विविध विभागांचे विभाग प्रमुखही  उपस्थित राहणार आहेत.

00000

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *