मराठा आरक्षण सल्लागार समितीची बैठक संपन्न

मराठा आरक्षण सल्लागार समितीची बैठक संपन्न

मुंबई, दि. मराठा आरक्षणकरिता झालेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने जारी करण्यात आलेली सगेसोयरेबाबतची अधिसूचना, त्याचबरोबर आतापर्यंत केलेली कार्यवाही, आरक्षणबाबत विविध न्यायालयातील याचिकांबाबत चर्चा करुन सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे न्यायमूर्ती डी.बी. भोसले (निवृत्त) यांनी अभिनंदन केले. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने नेमलेल्या  न्यायमूर्ती भोसले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची आज सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक  झाली.

न्यायमूर्ती  भोसले (निवृत्त) यांनी  राज्य  मागासवर्ग आयोग आणि त्यांची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तसेच ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षण करणाऱ्या सर्व  सदस्यांचे  कौतुक केले. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचे तसेच  मोठ्या प्रमाणातील नोंदी शोधण्याकरीता कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले.

या बैठकीमध्ये न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील नेमलेल्या समितीने केलेल्या आतापर्यंतच्या कार्यवाहीचा आढावा घेतला. कुणबी नोंदी शोधण्याकरिता करत असलेले विशेष कक्षामार्फतची कार्यवाही, तसेच समितीचा पहिला आणि दुसरा अहवाल दिल्यानंतर समितीच्या कालावधीत शोधलेल्या विविध नोंदी असणाऱ्या कुणबी वारसदारांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्राच्या अनुषंगाने झालेल्या कार्यवाहीबाबत आणि समितीस देण्यात आलेल्या मुदत वाढीपर्यंत करावयाची कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा झाली.

न्या. भोसले यांनी आंदोलनाच्या अनुषंगाने ज्या कुशलतेने सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि त्यांच्या संपूर्ण  प्रशासकीय यंत्रणेने हाताळलेले कौशल्य याबद्दल त्यांचे अभिनंदन करून  धन्यवाद दिले.

या बैठकीस न्या. मारोतराव गायकवाड, (निवृत्त) न्या. संदीप शिंदे (निवृत्त)  उपस्थित होते. सामाजिक न्याय विभागाचे सचिव   सुमंत भांगे,  सुवर्णा केवले, आरक्षणाच्या अनुषंगाने नेमण्यात आलेले विधीज्ञ अभिजित पाटील, वैभव सुखदरे आणि  अक्षय शिंदे यांच्यासह संबंधित विभागातील मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *