विनोद वाईन्स हटविण्याची कार्यवाही तातडीने करावी ना.शंभुराजे देसाईंचे आदेश..आ.फारुख शाह
धुळे – आझाद समाज पार्टीच्या वतीने गेल्या दोन महिन्यांपासून धुळे शहरातील मध्यवर्ती भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागे असलेले विनोद वाईन्स हे विदेशी मद्याचे दुकान हटवावे यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. दि.१ फेब्रुवारी पासून आझाद समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. दि.३ फेब्रुवारी रोजी उपोषणस्थळी आ.फारुख शाह यांनी भेट देवून उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांना पाठिंबा दिला होता आणि आंबेडकरी जनतेच्या भावनेशी खेळणाऱ्या विनोद वाईन्सचा कायमचा निकाल लावण्यासंदर्भात मंत्रालयीन पातळीवर प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले होते.त्यानुसार गुरुवारी मंत्रालयात ना.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री महोदयांच्या मंत्रालयीन दालन क्र.३०२,मुख्य इमारत, ३रा मजला येथे बैठक संपन्न झाली.या बैठकीस आ.फारुख शाह,जिल्हाधिकारी धुळे,(व्हिडिओ कॉन्फरन्सिंग)पोलीस अधिक्षक, (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग)धुळे, मुकुंद शिरसाठ,श्री.मुकुंदराव शिरसाठ,ॲड. सुमित साबळे.जितेंद्र निकाळजे,कैलास जैस्वार आणि उपोषणकर्ते आझाद समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे हे धुळे येथील उपोषण स्थळावरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले.या बैठकीत विनोद वाईन्स संदर्भात चर्चा करण्यात येवून आ.फारुख शाह यांनी धुळ्यातील आंबेडकरी जनतेच्या तीव्र भावना मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या तर उपोषणकर्ते आनंद लोंढे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कुठल्याही शासननिर्णयापेक्षा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पावित्र्य मोठे आहे.त्यामुळे शासनाने हे दुकान हटविलेच पाहिजे असे मत मांडले.बैठकीत सहभागी सर्वांचे म्हणणे ऐकून मद्यविक्री दुकान १० दिवसांकरिता बंद ठेवण्यात यावे आणि आणि दि.९ रोजी अधिक्षक,राज्य उत्पादन शुल्क,धुळे आणि जिल्हाधिकारी धुळे यांनी दुकान मालकाला पाचारण करून मद्यविक्री दुकान स्थलांतरित करण्याची कार्यवाही तातडीने करावी असे आदेश ना.शंभूराज देसाई यांनी दिले.त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असलेले मद्यविक्री दुकान त्याठीकाणाहून हटविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.याबैठकीत धुळे येथील उपोषणस्थळावरून संतोष अमृतसागर,भैय्यासाहेब वाघ,किरण भालेराव,दावल वाघ,चिंतामण थोरात,मुकेश वाघ,जितेंद्र शिरसाठ,राज चव्हाण,आनंद सैंदाणे,मुकेश खरात,आसिफ शाह,संजय अहिरे,विनोद केदार,डॉ.शरद भामरे,अरविंद निकम,दिनेश निकूंभे, आदी सहभागी झाले होते.विनोद वाईन्स हटविण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे धुळे जिल्ह्यातील आंबेडकरवादी जनतेने आनंद व्यक्त केला आहे.