महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये आशा व गटप्रवर्तक महिलांना मानधन वाढ देण्याबाबत आर्थिक तजबीज करण्यासाठी मुख्य सचिवांनी अहवाल सादर करण्याचा निर्णय.
9 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आशा व गटप्रवर्तक महिला संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना मानधन वाढीबाबत शासन निर्णय जाहीर करावा अशी मागणी केलेली होती व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या होत्या. त्याबाबत निर्णय न झाल्याने मुंबई आझाद मैदान येथे मागील सहा महिन्यापासून हजारो अशा व गटप्रवर्तक महिलांचे आंदोलन सुरू आहे या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्याताई चव्हाण यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण आझाद मैदान मध्ये मागील सहा दिवसापासून ज्या प्रकारे अशा गटप्रवर्तक महिला किमान 20000 च्या पुढे जे आंदोलन करीत आहेत ते त्याच ठिकाणी या महिलांना मुक्काम करावा लागत असल्यामुळे त्यांची हलाची परिस्थिती पाहून तातडीने त्याने हस्तक्षेप घेण्याची करण्याची तयारी दाखवली. त्यांनी कृती समितीस सांगितले की आशा गटप्रवर्तक प्रतिनिधीना घेऊन आपण मुख्यमंत्र्यांच्या कडे जाऊन त्यांची भेट घेऊ.
यानुसार आमदार विद्या चव्हाण यांच्याबरोबर ज्येष्ठ कामगार नेते कॉ शंकर पुजारी, कॉम्रेड राजेंद्र साठे, कॉम्रेड अर्चना घुगरे व उषा मेश्राम यांना मंत्रालयात घेऊन गेले आमदार विद्याताई चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना आशा गटप्रवर्तकांच्या मागण्या सांगितल्यानंतर मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी शिष्टमंडळास सांगितले की आजच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असा निर्णय करण्यात आलेला आहे की आशा व गटप्रवर्तक महिलांना जी मानधन वाढ द्यावयाची आहे त्याबाबत महाराष्ट्र शासनावर आर्थिक दृष्ट्या किती ताण पडणार आहे व त्यासंबंधी शासनाने कसा निर्णय घेतला पाहिजे यासाठी महाराष्ट्राचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांना सत्वर अहवाल देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्यांनी असेही सांगितले की अशा व गटप्रवर्तक यांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये सहानुभूती असून त्यांना आम्ही निश्चितपणे मानधन वाढ देणार आहोत.
यानंतर आझाद मैदान येथे जमलेल्या हजारो महिलांना मुख्यमंत्र्यांच्या बरोबर झालेल्या चर्चेची माहिती देण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार विद्याताई चव्हाण यांनी तातडीने लक्ष घालून वेळ काढून मुख्यमंत्र्यांची भेट घडऊन दिल्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक हार्दिक आभार जमलेल्या सर्व स्त्रियांनी जोरदार टाळ्या वाजवून केले.
आझाद मैदान मध्ये जमलेल्या 20000 महिलांचे नेतृत्व कॉ शंकर पुजारी, कॉ राजू देसले, कॉ निलेश दातखिळे, कॉम्रेड दत्ता देशमुख, कॉ आनंदी अवघडे, कॉ उज्वला नांदेडकर, विनोद झोडगे, कॉम्रेड मुगाची बुरुड, कॉम्रेड मंगल नागपूर, कॉ मंदा डोंगरे इत्यादीनी केलें
दरम्यान अशा गटप्रवर्तक कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने असा निर्णय घेण्यात आलेला आहे की संप न्याय मिळेपर्यंत चालूच राहील. उद्याच्या आंदोलनाबद्दल कृती समितीचे बैठक घेऊन निर्णय केला जाणार आहे.
वंचित बहुजन आघाडी व मुंबई ठाण्या मधील अशा महिलांनी आझाद मैदान मधील महिलांना दररोज सकाळ संध्याकाळ जेवण दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार मानण्यात आले.
Posted inमुंबई
महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये आशा व गटप्रवर्तक महिलांना मानधन वाढ देण्याबाबत आर्थिक तजबीज करण्यासाठी मुख्य सचिवांनी अहवाल सादर करण्याचा निर्णय
