जे. जे. मगदूम इंजिनिअरिंगचा विद्यार्थी चिंचणीकर याची शेतकऱ्यांसाठी कृषी ड्रोन ची निर्मिती

जे. जे. मगदूम इंजिनिअरिंगचा विद्यार्थी चिंचणीकर याची शेतकऱ्यांसाठी कृषी ड्रोन ची निर्मिती

जे. जे. मगदूम इंजिनिअरिंगचा विद्यार्थी चिंचणीकर याची शेतकऱ्यांसाठी कृषी ड्रोन ची निर्मिती
जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचा विद्यार्थी अक्षय चिंचणीकर यांनी शेतकऱ्यांच्यासाठी सम्मीद्वय कृषीड्रोन बाजारात उपलब्ध करून दिला आहे.
पारंपारिक शेतीला फाटा देऊन आजचा शेतकरी व्यवसायिक शेतीकडे वळला आहे. शेतमशागतीपासून औषध वापरापर्यंत आधुनिक तंत्राचा वापर करून कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न घेण्यावरती शेतकरी भर देत आहेत. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कमी वेळेत कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेळच्या वेळी औषध फवारणी घेतली असता शेतकऱ्याला त्याचा उत्पन्नामध्ये फायदा होऊ शकतो. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून डॉ.जे.जे. मगदूम इंजीनियरिंग कॉलेजच्या अक्षय चिंचणीकर या विद्यार्थ्याने ड्रोनचे मॅन्युफॅक्चरिंग मिरज या ठिकाणी सुरू केले आहे.
संपूर्ण मेटल बॉडी मध्ये तयार केलेला हा ड्रोन चार ते पाच मिनिटांमध्ये एक एकर शेतीची फवारणी करू शकतो. ड्रोन ची किंमत ३,५०, ooo/- रुपये इतकी असून दोन युनिट लाईट चार्जिंग वरती तीन एकरची फवारणी होऊ शकते. पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग करणारी आमची एकमेव कंपनी असून ड्रोनची सर्व बॉडी मेटल मध्ये तयार केलेली आहे.
तथापि शेतकऱ्यांच्यासाठी व शेती विकास सेवा संस्थेच्या साठी हा ड्रोन खरेदी करण्याचा मानस लोकांनी ठेवला तर त्यामध्ये चांगल्या सेवेसोबत वॉरंटी गॅरंटी देऊन किमतीमध्ये ही सवलत देऊ असे अक्षयने मुलाखती वेळी सांगितले.
या संशोधनाची जननी म्हणजे डॉ. जे जे मगदूम इंजीनियरिंग कॉलेज असून ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम व्हाईस चेअर पर्सन डॉ. सोनाली मगदूम यांचे प्रोत्साहन, महाविद्यालयाचा रिसर्च डेव्हलपमेंट सेल, प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील, डीन आर. अँड डी. डॉ. डी. बी. देसाई,प्राध्यापक मनीषा फुटाणे व इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमधील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले असे त्यांनी नमूद केले. कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे ॲडव्हायझर डॉ. उमेश देशन्नवार यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजला ऍटोनॉमस संस्थेचा दर्जा मिळाला त्यासाठी आम्ही आनंदी असून मुलाखती दरम्यान त्यांने महाविद्यालयाचे अभिनंदनही केले.अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी ८३२९०४५८०० या नंबरशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *