
कोल्हापुर : पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना व परिर्वतन फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
टाऊन हॉल गार्डन येथील ऐतीहासीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संगमरवरी पुतळ्यास लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना ज्येष्ट विधिज्ञ ॲड .धनंजय पठाडे म्हणाले , निव्वळ महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतात हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली या स्वराज्यात सर्व जाती धर्मातील लोकाचा सहभाग होता .
या प्रसंगी ॲड धनजंय पठाडे यांच्या हस्ते पोलिस उप अधिक्षक सरदार नाळे यांचा वृक्षाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला . पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले , परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष अमोल कुरणे, जिल्हाध्यक्ष जयसिंगराव कांबळे ,निवास सुर्यवंशी (उद्योजक ) , सौ .संध्या सुर्यवंशी ,दिलिप कदम (कोच बॉडी बिल्डर ), संभाजी चौगुले (पत्रकार ) ,चंद्रशेखर म्हस्के (अध्यक्ष मृत्युंजय चारिटेबल ट्रस्ट ) ,उत्कर्ष भंडारे ‘,फिरोज सत्तारमेकर ( अध्यक्ष जमजम फौंडेशन ) प्राचार्य डॉ .आरती भोसले छ.शिवाजी शिक्षण शास्त्र महाविद्यालय, प्रा . विशाखा पाटील , नाजरीन आत्तार , स्मीता पाटील , मनोज जाधव , नेहा विरल , सुरज अपराध ( पोलिस कॉन्स्टेबल ) , भिमराव कांबळे आदी उपस्थित होते
