
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री तानाजी सावंत यांनी एक नोव्हेंबर 2023 रोजी आशा व गटप्रवर्तक महिलांच्या संघटना संयुक्त कृती समिती बरोबर चर्चा करून निर्णय घोषित केला होता की,सर्व महाराष्ट्रातील आशा महिलांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ व गटप्रवर्तक महिलांना दहा हजार रुपये मानधन वाढ आणि दोन हजार रुपये भाऊबीज देण्यात येईल. प्रत्यक्षात तीन महिने झाले तरी या निर्णयाचां शासकीय आदेश जी आर महाराष्ट्र शासनाने अद्याप काढलेला नाही.
दरम्यान महाराष्ट्रामध्ये आशा महिलांचा संप झाल्यानंतर राज्यातील आरोग्य खात्यामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप केला त्यानंतर अंगणवाडी महिलांनी संप केला अशा प्रकारे महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचारी वेतन वाढीसाठी संघर्ष करीत असून सरकारच्या नकारात्मक भूमिकेचा निषेध करीत असून त्यांच्यामध्ये या सरकारविरुद्ध असंतोष वाढत चाललेला आहे.
बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाची मीटिंग होण्याची शक्यता आहे.या मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये आशा व गट प्रवर्तक महिलांच्या मानधन वाढीबद्दल निर्णय न झाल्यास महाराष्ट्रामध्ये आशा व गटप्रवर्तक महिलांचे तीव्र आंदोलन होईल.असा इशारा आझाद मैदान येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये अखिल भारतीय आशा गटप्रवर्तक आयटक फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते कॉ शंकर पुजारी यांनी इशारा दिलेला आहे.
आयटक संघटनेमार्फत अनेक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये महिलांनी भागीदारी केलेली असून त्यामध्ये
विद्या कांबळे, विद्या भालेकर, विजया शिंदे, अंजली पाटील, इंदुमती येलमर, तृप्ती देसाई, श्वेता वायंगणकर, संचिता चव्हाण, सन्मुखी देसाई इत्यादींनी महत्त्वपूर्ण भागिदारी केलेली आहे.