मंगळवार दिनांक 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मराठा सेवा संघ सभागृह सांगली येथे आयटक कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांचा घर हक्कासाठी भव्य मेळावा!
सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचा घरे मिळण्यासाठी सदर मेळावा आयटक कामगार संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे.
सध्या सांगली शहरांमध्ये 357 बेघर कुटुंबीयांना वाल्मी आंबेडकर वसाहत मध्ये सुस्थितीत प्लॉट मिळण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच मिरज समता नगर मध्ये गोखले बिल्डर्स यांनी बांधलेल्या फ्लॅट्स मध्ये 90 नोंदीत बांधकाम कामगारांना फ्लॅट्स मिळालेले आहेत. विशेष म्हणजे या फ्लॅटची किंमत सध्या बाजारभावाने 15 लाख आहे. परंतु बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून दोन लाख रुपये आणि प्रधानमंत्री आवास योजनेतून अडीच लाख रुपये मिळाल्यामुळे त्याचबरोबर शासकीय योजना असल्याने हा फ्लॅट केवळ सहा लाख रुपये मध्ये मिळवून देण्यामध्ये निवारा बांधकाम कामगार संघटनेस यश आलेले आहे.
सध्या सांगली जिल्ह्यामध्ये इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत एकूण 75 अर्ज मंजूर झालेले त्यांचे घराचे बांधकाम सुरू झालेअसून अद्यापी पंधराशे अर्ज मंजूर होत आहेत. त्याबाबतही नव्याने महाराष्ट्र शासनाने धोरण जाहीर केल्यामुळे त्यांना सुद्धा घर मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शहरी व ग्रामीण भागामध्ये ज्यांना घर बांधण्यासाठी जमीन नाही त्यांना घरासाठी महाराष्ट्र शासनाने जमीन उपलब्ध करून द्यावी अशी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे. तरी या सर्व बाबींच्या संदर्भामध्ये या मेळावा मध्ये चर्चा होणार आहे.
दरम्यान सध्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा सर्वर डाऊन असल्यामुळे संगणकीय काम खोळंबलेले आहे. त्यामुळे वेळेवर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांड्याचा सेट व अत्यावश्यक वस्तूंची पेटी मिळण्यामध्ये अडचणी आलेल्या आहेत.तरी या अडचणी लवकरच दूर करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा सुरू आहे म्हणूनच या संदर्भातली ज्यांची तक्रार असेल त्यांनी सोमवार दिनांक 11 मार्च रोजी निवारा बांधकाम कामगार संघटना कार्यालयामध्ये उपस्थित रहावे असे आवाहन करणारे पत्रक महाराष्ट्र राज्य आयटक कामगार संघटनेचे राज्यसचिव कॉ शंकर पुजारी यांनी पत्रक प्रसिद्धस दिलेले आहे.
Posted inसांगली
मंगळवार दिनांक 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मराठा सेवा संघ सभागृह सांगली येथे आयटक कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांचा घर हक्कासाठी भव्य मेळावा!
