दर्पण नंतरचे वृत्तपत्र
‘ज्ञानोदय ‘
महाराष्ट्र पत्रकारिता:
एक साहित्यासिक योगदान
सुधारणांचा इतिहास हा खूप व्यापक असतो .तो मागील दीर्घ कालखंडापासून तपासून घ्यावा लागतो. हे अभ्यासात असताना असे आढळते सुधारणा ही तंत्रज्ञानाच्या पुढे येते ती त्या वेगाने होते. पण सुधारणा ही स्वीकारण्याचे प्रमाण तंत्रज्ञानाच्या स्वीकाराप्रमाणे नुसार असत नाही असे अनेक वेळा घडते इतिहास तर तंत्रज्ञानाच्या अभावाचाच असतो .इतिहासाकडून यापेक्षा करता येत नाहीत हे खरे पण इतिहासात ज्या रूढी आणि परंपरा तयार झालेल्या असतात. त्या पुढे चालत आलेल्या असतात .त्यांचे सतत परिशिलन करण्याची वृत्ती समाजाच्या अंगी मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची गरज असते समाज बदलतो विचारातून आणि विद्रोहातून पण विद्रोह तयार होतो. विचारातून परिवर्तन होते ते विचारतो विचार प्रसूत होतो लेखनातून म्हणून लेखन परंपरा ही इतिहासाला सशक्त करते लेखन परंपरा असलेले मानवी समूह प्रभुत्व गाजवतात आपल्या प्रभुत्वाला धक्का लागू नये म्हणून मुद्रण सत्तेची मालकी अविष्कार स्वातंत्र्याची मालकी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मालकी स्वतःकडे ठेवू इच्छितात. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडात ब्रिटिश साम्राज्यवादाचा जो प्रसार झाला तो केवळ कंपनी व्यापार या हेतूने झालाच पण त्याहून तो धर्मप्रसार आणि त्यासाठी शिक्षण आणि आरोग्यसेवा हे काम ख्रिस्ती मिशनऱ्यांनी त्या कालखंडात हाती घेतले होते.
आज पत्रकारिता उध्वस्त झाली आहे ती विकलेली आहे ती कार्पोरेट घराण्यांच्या हातात आहे मांध्यम सत्ता आणि सत्ताधारी हे एक होऊन इच्छेचे स्वातंत्र्य नागरिकांना अधून मधून देतात किंबहुना त्यांच्या सुप्त विचारसरणी कायम ठेवून ते सुधारणावाद पुढे नेतात सुधारणा वादातराजकारण असते सुधारणा वाद हा विचार वाद असतो हा विचार प्रसार असतो हा समाज साक्षर करण्याचा निरंतर ध्यास असतो तो असायला हवा ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या अहमदनगर स्थित स्वातंत्र्यपूर्व काळातील 1842 मधील ज्ञानोदयचा अंक हा पत्रकारितेचा आदर्श आहे 20 जून 842 रोजी शिळा प्रेस वर छापलेला वीस पृष्ठांचा ज्ञानोदयचा अंक हा छापून त्यास 185 वर्षे झाली एखाद्या वृत्तपत्राचा एवढा प्रदीर्घ इतिहास हा खूप मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे ज्ञानोदयच्या च्या संपादक मंडळात हेनरीबॅलेटन यांचे मोठे योगदान आहे ते पहिले संपादक होते संपादकांच्या मालिकेत डब्ल्यू होम एसबी फेयर बॅक रेवेडेंट एजंट शाहू दाजी कुकडे ए एस हुम यु सी डब्ल्यू पार्क तुकाराम नथुजी सुमंत विष्णू करमरकर नारायण वामन टिळक दे ना टिळक भा पा हिवाळे शा ल साळवी प्र शी भोसले सु धो रामटेके जेnडब्ल्यू आयरन ए जी बोर्डे डी जे तिवडे र ह केळकर ल ना चौधरी सुद करंदीकर ह भा उजगरे यांचे योगदान मराठी वृत्तपत्र सृष्टी समजावून घेईल ?
ज्ञानदेव च्या अंकात इंग्रजी आणि मराठी असे दोन्ही स्वरूपाचे लेखन छापले जात असे 1845 ते 866 पर्यंत बारा पृष्ठांचा ज्ञानोदय प्रकाशित करण्यात येत असे 1867 ते 72 या कालखंडापर्यंत शाहूराव दाजी कुकडे यांनी ज्ञानोदय साठी केलेले कष्ट हे विसरता येणार नाहीत ज्ञानोदय हे प्रथम नियतकालिक साप्ताहिक अशा स्वरूपामध्ये प्रकाशित होत होते पुढे ज्ञानोदयाचे मुंबईला करण्यात आले व सप्टेंबर 1992 पर्यंत ज्ञानोदय मुंबई मधून प्रकाशित होता .
ज्ञानोदयच्या जून एक 1842 च्या अंकामध्ये अमेरिकन मिशनरी लोक हा अंक काढताना आपली भूमिका विषयच करतात भूगोल विद्या ज्योतिषशास्त्र पदार्थ विज्ञान बखर अशा गोष्टी या देशाच्या व इतर देशाच्या याचे वर्तमान लोकांना कळावे म्हणून मजकूर छापावा असा त्यांचा बेत होता लोकांना आपल्या चालीरीती जाहीर करायच्या असतील तर त्यांनी आपले मत सांगावे असेही संपादक पहिल्या अंकात नमूद करतात अयोग्य मत छापणार नाही दर महिन्यातून एक वेळ ज्ञा नोदयचा अंक निघेल. अशी भूमिका संपादकाची प्रसिद्ध करणारा हा ज्ञानोदय महाराष्ट्राचा ज्ञानोदय अनेक अर्थाने पुढे ठरला याची कारणे आधुनिक महाराष्ट्र बदलता महाराष्ट्र समजावून घेईल तर कृतज्ञतेची पत्रकारिता पुढे जाईल असे नम्रपणे नमूद करार असे वाटते सती प्रथा म्हणजे सतीला बत्ती आणि वेश्येला हत्ती देणारा महाराष्ट्र हा आजही विषमतावादी आहे म्हणून सती प्रथेविरुद्ध ज्ञानोदयने आवाज उठवला याचे विस्मरण तमाम महिलांना होता कामा नये .ख्रिस्ती मिशनऱ्यांचे बालविवाह बहुपत्नीत्व विधवा विवाह कन्या विक्री या क्षेत्रातील काम आजही प्रगत महाराष्ट्र समजावून घेत नाही .या सर्व कु प्रथा नाहीसा करण्यासाठी प्रथम आवाज उठवणारा ज्ञानोदय आणि जनजागृती करणारा ज्ञानोदय हा प्रबोधन क्षेत्रातला कायम मानदंड आहे .तो पत्रकारितेचा सुधारक विचारवादाचा महाराष्ट्र देशी सुरू झालेला तो मुळारंभ आहे ज्ञानदेय च्या आगमनाने नगर स्थित व मुंबई स्थित झालेली समाज जागृती आणि लोकांच्या बुद्धीला मिळालेली चालना यातूनच कणकण परिवर्तन झाले .असे मान्य करावे लागते कला संस्कृती आरोग्य इतिहास विज्ञान या ज्ञानाच्या क्षेत्रातील सर्व सीमा ज्ञानोदयने विस्तीर्ण केल्या असा ज्ञानोदय ऐतिहासिक व वैज्ञानिक पुढे लेखन देऊ लागला आणि त्यातूनच ज्ञानोदय हा ख्रिस्ती समाजाचे प्रबोधन अस्त्र बनला होता चर्च ऑफ स्कॉटलंड मिशनऱ्यांनी मुंबई पुणे जालना नागपूर येथे आरोग्य क्षेत्रात रुग्णसेवेमध्ये काम केले आहे त्या सर्व कामाची माहिती 1991 च्या 90 च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेल्या दक्षिण महाराष्ट्रामधील मिरजेचे वाणलेस वाईचे मिश्रण हॉस्पिटल यांचे काम पुणे येथील प्राथमिक शाळा हायस्कूल ट्रेनिंग कॉलेज लेप्रसी मिशन हॉस्पिटल ही लोकोपयोगी कामे आज छुप्या हिंदुत्ववादी महाराष्ट्राला ही कामे दिसत नाहीत ती विसरून कृतघ्न पणे ख्रिस्ती मिशनरी अल्पसंख्यांक यांना आज लक्ष केले जात आहे त्यांच्या कार्यात राजकारणी खो घालत आहेत त्यांच्या हजारो कोटीच्या जागा गिळंकृत करीत आहेत केंद्रातील राज्यातील मंत्री या भूखंड माफियागिरीत रकारच्या अधिकार पदाचा वापर करून ख्रिस्ती मिशनर्यांना जेरीस आणत आहेत हे आज महाराष्ट्राचे वास्तव आहे हजारो दावे हजारो भूखंड प्रकरणे ग्रंथ करणे हे प्रगत महाराष्ट्राला ज्ञानोदय ने दिलेले ज्ञान मानावे का? असा कधीतरी प्रश्न मनात उपस्थित होतो?
आयुष्याच्या काही काळात सातारा स्थित असलेले ख्रिस्ती भूषण कविवर्य रेवड नारायण वामन टिळक ज्ञानोदयच्या अंकाच्या मलपृष्ठावर आपल्या कवितेत म्हणतात.
सांगे ख्रिस्त गुरु तशा कृती करू सदर आचरू. l
संसाराब्दी तरू जगास उतरू, प्रेमे जगाला भरू l
दुःखाचा निकरू, अढोउधव हरू देवाजीचे लेकरू l
नावा सार्थ करू सुनीती वितरू, ज्ञानोद य विस्त् रु l
संदर्भ. . भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे. अंक जुलै 1991
शिवाजी
राऊत सातारा दिनाक 9 मार्च 24 वेळ 7. 05