कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यावर राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह संपन्न

इचलकरंजी
हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याच्या कार्यस्थळावर राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यानिमित्त सुरक्षेच्या दृष्टीने विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. कामावर असताना सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी करावयाच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती सुरक्षा अधिकारी एस. बी. वासमकर यांनी दिली. सुरक्षिततेसाठी कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या अद्यावत उपकरणांची माहिती कामगारांना देण्यात आली. तसेच अपघात घडू नये यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षा शपथ देण्यात आली.
सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, संचालक आण्णासाहेब गोटखिंडे, सूरज बेडगे, चीफ इंजिनियर विकास कवडे, चीफ केमिस्ट एन.एस. पाटील, मेडीकल ऑफिसर डॉ. उमेश माने, सेफ्टी ऑफिसर शोएब खलिफा, कैवल्य शास्त्री, जवाहर साखर कामगार संघटनेचे सर्व सदस्य, कारखान्याचे सर्व अधिकारी-कर्मचारी कामगार उपस्थित होते.