इचलकरंजी – जनरल हमाल माथाडी कामगार संघटना व अखिल महाराष्ट्र कोल्हाटी-डोंबारी समाज संघटना यांच्या सहकार्याने माथाडी कामगार अध्यक्ष शांताराम लाखे यांच्या वतीने कामगार नेते कै. यशवंत लाखे यांची तिसरी पुण्यतिथी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आले. या निमित्ताने समाजातील निराधार, गरीब, गरजू महिलांना अन्नधान्य वाटप, दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कामगार नेते कै. यशवंत लाखे यांनी आपले संपूर्ण जीवन कामगारांच्या न्याय हक्कासाठी व्यथित केले. म्हणूनच त्यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. लाखेनगर येथे संपन्न कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या हस्ते आणि श्रीरंग खवरे विठ्ठल चोपडे, रवि रजपुते, कामगार नेते शामराव कुलकर्णी, बाळासाहेब कलागते, अशोक शिंदे, जितेंद्र जानवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अन्नधान्य व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
जनरल हमार माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शांताराम लाखे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात कै. यशवंत लाखे यांच्या कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी अहमद मुजावर, पंकज त्रिपाठी, हनमंत ऐवळे, चंद्रकांत जावळे, शामराव आवळे, प्रताप लाखे, रवि जावळे, नौशाद जावळे, बाबासाहेब लाखे, विठ्ठल आवळे, शंकर लाखे, संतोष लाखे, अशोक लाखे, राजु देवकुळे, शंकर बंडगे, अजित ऐवळे, मारुती मडिमनी, आदम शेख, शिवाप्पा कोळी, महांतेश मुक्ताहार, अरविंद तळवार आदींसह भागातील नागरिक उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
कामगार नेते कै. यशवंत लाखे यांची तिसरी पुण्यतिथी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी
