दर्याखोऱ्यात , वाड्यावास्त्यावर राहणाऱ्या मेंढपाळ बांधवांच्यासाठी रात्रंदिवस झटणारे श्री.संजय वाघमोडे साहेब यांनी खासदारकी लढवावी…
फक्त कोल्हापुरी जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मेंढपाळांच्या वर कोणताही प्रसंग येऊ दे .रात्री अपरात्री सुद्धा धावून जाणार महाराष्ट्रातले एकमेव नाव म्हणजे श्री संजय वाघमोडे साहेब
संजय वाघमोडे साहेबांचा कार्याचा आढावा थोडक्यात
१) यशवंत क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष
२) सामाजिक कार्यात सक्रिय
३) एक वही समाजबांधवांसाठी
दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या समाज बांधवांच्या मुलांसाठी …या उपक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी लोकसहभागातून विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य..केवळ आर्थिक परिस्थिती नसल्याने विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये यासाठी गेले अनेक वर्ष हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे
हा उपक्रम राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त लोकांना आवाहन केले जाते.. अहिल्यादेवीची जयंती धुमधडाक्यात साजरी करा.. परंतु अनावश्यक खर्च टाळून एक वही समाज बांधवांसाठी… या उपक्रमात शैक्षणिक साहित्य देऊन सहभाग. व्हा..
४) एक काँल.. प्राॅब्लेम साँल… या उपक्रमातून संपूर्ण महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवाच्या अडचणीत मदत केली जाते…
या उपक्रमातून शेकडो मेंढपाळांना लाखो रुपये नुकसान भरपाई मिळवून देण्यात आली आहे..
५) कै. रामचंद्र गडदे रा. नागोळे ता. कवठेमहांकाळ जि. सांगली या वीज पडून ठार झालेल्या मेंढपाळांच्या वारसांना ४लाख ३०हजार रु. शासनाकडून अर्थिक मदत मिळवून दिली..
६) ;वन्यप्राण्यांच्या हल्यात ठार झालेल्या शेळ्या मेंढ्या मालकांना हजारो रुपये मदत मिळून संघटनेच्या माध्यमातून दिली…
७)कोरोना काळात मेंढपाळांना जिल्हाबंधीतून वगळ्याबाबत शासनदरबारी प्रयत्न करून जिल्हाबंधीतून वगळण्यात महत्त्वाची भूमिका..
८) कोरोना लाँकडाऊन मध्ये यशवंत क्रांती वैद्यकीय मदत कक्ष सुरू करून मेंढपाळांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात महत्त्वाची भूमिका..
९) अनेक गरीब इंजिनियरींग व मेडिकल विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च लोक सहभागातून…
१०)वन्य प्राण्यांच्या हल्यात जखमी झालेल्या अनेक गरिब धनगर वाड्यावरील विठ्ठल बाजारी या बांधवांचा संपूर्ण उपचार लोकसहभागातून..
११) सतत पाठपुरावा करून जंगलात राहणाऱ्या धनगर बांधवांची पाळीव जनावरे वन्यप्राण्यांच्या हल्यात ठार झाली तर नुकसान भरपाई मिळत नव्हती यासाठी सतत प्रयत्न करू सन २००४ शासन निर्णय बदलून जंगलात राहणाऱ्या बांधवांना न्याय मिळवून दिला..
१२)वसंतराव नाईक महामंडळाच्या योजना राष्ट्रीय बँकेबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुरू सतत केलेल्या पाठपुराव्यास यश…
१३) महामेश योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मेंढ्या आणण्यासाठी रांजणी ता. कवठेमहांकाळ जि. सांगली येथे जावे लागत असे.. त्यासाठी मेंढपाळ, लाभार्थ्यांना मेंढ्यांसाठी गाडी भाडे, डॉक्टर नेण्यासाठी चार चाकी वाहन यासाठी २० ते २५ हजार रुपये खर्च येत होता.. मेंढपाळांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करून लाभार्थ्यांना मेंढ्या कोल्हापूर उपायुक्त कार्यालयात मिळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश येऊन २०२४ पासून लाभार्थ्यांना रांजणी ऐवजी मेंढ्या कोल्हापूर येथेच उपलब्ध होणार..
१४)केवळ वेळेत उपचार न मिळाल्याने दर वर्षी कुठे ना कुठे तरी दुर्गम भागात एखाद्या बांधवाचा मृत्यू होत आहे हे टाळण्यासाठी प्रत्येक धनगर वाड्यावर शासनाकडून आरोग्य दुत नेमण्यात यावेत याबाबत पाठपुरावा सुरू आहे..
१३) बिरू जोंग रा. राशिवडे ता. राधानगरी यांच्या मेंढरांच्या तळावर लांडग्यानी हल्ला करून ३२ मेंढरं ठार मारली होती. त्यास वनविभागाकडून २,४४,७६३/- रुपये नुकसान भरपाई व लोकसहभागातून सोशल मिडीयावर आवाहन करून १,५०,०००/- जमा करून जमा झालेल्या व वनविभागाकडून मिळालेले पैसे एकत्र करून त्यास ३० मेंढरे घेऊन त्याला उभारी देण्याचा प्रयत्न
त्यांच्या कार्याची दखल घेऊन आतापर्यंत संजय वाघमोडे यांना यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय समाजभूषण, धनगर रत्न, धनगर योध्दा, देवदूत, कोव्हीड योध्दा, यासारख्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.
त्याचबरोबर हातकणंगले ,शिरोळ ,वाळवा , पन्हाळा, शाहूवाडी, या तालुक्यात मोठ्या प्रमाणात यशवंत क्रांती या नावाने संजय वाघमोडे यांनी वेगवेगळ्या गावांमध्ये त्यांच्या शाखा बंधनीमुळे त्यांचा संपर्क खूप मोठा आहे.
म्हणुन यावेळेस हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून श्री संजय वाघमोडे साहेब यांनी उमेदवारी जाहीर करून निवडणूक लढवावी असे समस्त मेढपाळ समाज तसेच धनगर बांधव, सर्व जाती धर्माच्या सर्वसामान्य गोरगरीब, युवक युवती, मराठा,ओबीसी वर्गातून होत आहे .त्यामुळे यावरती विचार करून माननीय संजय वाघमोडे साहेब यांनी आपली उमेदवारी जाहीर करावी .असे मी या पोस्ट मधून त्यांना जाहीर विनंती करीत आहे
आपला विश्वासू
आपण लाभ मिळवून दिलेला सर्वसामान्य लाभार्थी मेंढपाळ🙏🙏