बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिव यानी आचारसंहितेचा भंग केला म्हणून सचिवावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी तक्रार राज्य मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे ई-मेल द्वारे दाखल.
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत आचारसंहितेमध्ये मनाई नसलेल्या कामे बंद करून महाराष्ट्रातील तीस लाख बांधकाम कामगारांच्या बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या सचिवाकडून अन्याय सुरू आहे.
16 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिव यांनी आदेश काढून बांधकाम कामगारांची कल्याणअर्थ सर्व कामाचे पोर्टल बंद केलेले आहेत.
त्या पत्रामध्ये असे नमूद केलेले आहे की मुख्य निवडणूक आयुक्तांची परवानगी घेऊन कामे बंद केली जातील परंतु प्रत्यक्षात मात्र कामे बंद करूनच ती कामे आचारसंहितेमध्ये बसतात का नाही हे आयोगाला सचिव विचारणार आहेत.
बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या सचिव यांनी जी कामे बड्या कंत्राटदारांच्या फायद्याची आहेत ती कामे मात्र आचारसंहितेमध्ये सुरू ठेवलेली आहेत. उदाहरणार्थ बांधकाम कामगारांचे आरोग्य तपासणी करणे . प्रत्यक्षात आरोग्य तपासणी करण्याचे कंत्राट ज्यानी घेतलेले आहे ते नोंदीत बांधकाम कामगारांच्या कडून रक्त काढून घेतात. परंतु प्रत्यक्षात मात्र एकही कामगारांस कंत्राटदार तपासणी रिपोर्ट देत नाहीत. मंडळ करोडो रुपये त्या कंत्राटदाराला देत असल्यामुळे हे काम मात्र या काळात सुरू ठेवलेले आहे.
तसेच बांधकाम कामगारांचे ऑनलाईन काम करण्यासाठी सध्या महाराष्ट्रामध्ये दररोज करोडो रुपये देऊन कंत्राटदारांना जे काम दिलेले आहे परंतु त्यांच्याकडून ते काम झालेच नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये 15 लाख अर्ज प्रलंबित आहेत. त्यातील अपयश झाकण्यासाठी आता तालुका पातळीवर कामगार सुविधा केंद्र निर्माण करण्याचा घाट या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने घातलेला असून त्यांना ते एका तालुका सुविधा केंद्राला दरमहा वीस लाख रुपये कंत्राटदारला देणार आहेत. आचारसंहिते काळातच अशी 358 केंद्रे महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहेत.आणि सर्व कामगारांचे नोंदणी, नुतणीकरण व लाभाचे अधिकार या कंत्राटदारांच्याकडे ते देणार आहेत. हे काम मात्र त्यांनी आचारसंहितेच्या काळात बंद केलेले नाही.
परंतु बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी करणे, बांधकाम कामगारांना त्यांच्या कार्डाचे नूतनीकरण करणे आणि बांधकाम कामगारांना प्रत्यक्षात लाभ मिळणे हे मात्र या सचिवानीं पूर्ण बंद करून टाकलेल आहे. त्यामुळे सध्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात 13 लाख नोटीत बांधकाम कामगार आहेत आणि १५ लाख बांधकाम कामगारांची सर्व कामे प्रलंबित आहेत. दोन लाख बांधकाम कामगारांची अर्ज रद्द केलेली आहेत.हे सर्व काम आता त्यांनी थांबवलेलं आहे.
अशाप्रकारे महाराष्ट्रातल्या 30 लाख बांधकाम कामगारांच्या वर सचिवाकडून अन्याय सुरू आहे.
अशा अन्यायाविरुद्ध कामगार संघटनांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्री एस चोकलिंग यांच्याकडे तारीख 22 मार्च रोजी ईमेलद्वारे कॉ शंकर पुजारी यांनी तक्रार दाखल केलेली आहे.
तरी अशाच प्रकारे तक्रार इतर संघटनांनी करावे असे आवाहन करणारे पत्रक महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष कॉ शंकर पुजारी यांनी प्रसिद्धस दिले असून निवेदनाची प्रत सर्व संघटनांना व्हाट्सअप द्वारे पाठवून दिली आहे. आचारसंहितेचा भंग केला म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे ई-मेल द्वारे तक्रार दाखल