
डॉ जे जे मगदूम ट्रस्ट संचलित डॉ जे जे मगदूम आयुर्वेद मेडिकल कॉलेज जयसिंगपूर यांच्या राष्ट्रीय सेवा योजने तर्फे मु पो हसुर ता शिरोळ जि कोल्हापूर येथे फेब्रुवारी 2024 मध्ये विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले सात दिवसीय शिबिरामध्ये विविध आरोग्य शिबिरे, शाळा तपासणी,मुलांची रक्तगट तपासणी,व्यसनमुक्ती या विषयावर जनजागृती करणारे पथ नाट्य स्वच्छता मोहीम वृक्षारोपण युवकांची सामाजिक बांधिलकी व स्त्रियांचे आरोग्य या विषयावर अनुक्रमे श्री प्रथमेश इंदुलकर व डॉ अश्विनी मोराळे यांच्या व्याख्यानाने जनजागृती रॅली मोफत रक्त लघवी तपासणी शिबिर इ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे 60 विद्यार्थी सहभागी झाले
राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून श्रीपाद थोरवत विद्यार्थीनी प्रतिनिधी म्हणून वैष्णवी सासणे यांनी काम पाहिले राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून डॉ मंजुषा देसाई तसेच सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून डॉ नम्रता हरळीकर व श्री सिद्धार्थ साठे यांनी काम पाहिले या शिबिरासाठी सुनिता रमेश चोपडे ग्रामपंचायत सरपंच हसुर श्री अभिजीत पाटील ग्रामपंचायत उपसरपंच हसुर तसेच ए पी पाटील सर्वोदय चारिटेबल ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य लाभले एकूण 300 ते 350 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ प्रमोद बुद्रुक संस्थेचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम तसेच संस्थेचे उपाध्यक्ष अँड डॉ सोनाली मगदूम यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने शिबिराची सांगता झाली अशाप्रकारे उत्साहात हे शिबिर पार पडले