‘डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी मध्ये’ ६ एप्रिल रोजी ” अश्वमेध “
जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये शनिवार दिनांक ६ एप्रिल २०२४ रोजी नॅशनल लेव्हल टेक्निकल इव्हेंट ” अश्वमेध २०२४ ” या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम यांनी दिली. या कार्यक्रमाच्या पोस्टरचे अनावरण करताना ते बोलत होते. यावेळी डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टच्या व्हॉइस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे उपस्थित होते.0
प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील म्हणाल्या, ‘अश्वमेध २०२४’ या टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन व प्रोजेक्ट कॉम्पिटिशन साठी जे. जे. मगदूम कॉलेजसह महाराष्ट्रातील प्रथित यश महाविद्यालया मधून १००० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यामध्ये पेपर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, कोडवॉर, यु. आय. डिझाईन, डेक्स्टर, स्ट्रकवॉर, लक्ष या स्पर्धांचा विभागवार समावेश केला आहे . या इव्हेंटचे रजिस्ट्रेशन दि.३ एप्रिलपर्यंत चालू राहणार असून विद्यार्थ्यांना स्पॉट रजिस्ट्रेशनही करता येणार आहे. सहभागी सर्व विद्यार्थी व टीम यांना सर्टिफिकेट देण्यात येणार असून विजयी स्पर्धकांना विभागवार प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी कॅश प्राईस देण्यात येणार आहे. तसेच सहभागी स्पर्धकांच्यासाठी महाविद्यालयाकडून लंच पुरविण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थी आपले पेपर balbhim. shinde@jjmcoe. ac. in या आयडी वरती पाठवू शकतात तसेच अधिक माहितीसाठी jjmcoe. ac.in या वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन प्रोग्रॅम कॉर्डिनेटर, विभाग प्रमुख प्रा. आर. ए. भारतीय यांनी केले आहे.
यावेळी रजिस्टार, सर्व डिन्स, विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी मध्ये’ ६ एप्रिल रोजी ” अश्वमेध “
