सिद्धार्थ तायडे यांना आत्मसन्मान गौरव पुरस्कार जाहीर
नांदुरा : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संघर्ष नायक मीडिया स्वराज्य क्रांती सेना पॅंथरआर्मी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती (कोल्हापूर) च्या वतीने यावर्षीचा आत्मसन्मान गौरव पुरस्कार नांदुरा तालुक्यातील विद्रोही पत्रकार सिद्धार्थ तायडे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक १३ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे होणार असल्याची माहिती संघर्ष नायक मीडियाचे प्रमुख संतोष आठवले यांनी सिद्धार्थ तायडे यांना पुरस्कार निवड पत्र देऊन कळवले आहे. वडनेर भोलजी येथील सिद्धार्थ तायडे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून समाजात समाजाच्या प्रबोधनासाठी विद्रोही पत्रकार म्हणून काम करताना युवा शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ तायडे यांना गेल्या वर्षी सुद्धा पद्मपाणि प्रतिष्ठान बीडच्या वतीने पद्मपाणी राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर यावर्षी सुद्धा त्यांना ७ जानेवारी रोजी दीपगंगा भागीरथी सेवाभावी संस्था मिरज जि. (सांगली) च्या वतीने “राज्यस्तरीय निर्भिंड पत्रकारिता ” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच समाज रत्न दयाभाई खराटे फाउंडेशन मलकापूर जिल्हा बुलढाणा च्या वतीने १२ जानेवारी २०२४ रोजी सिद्धार्थ तायडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर आता संघर्ष नायक मीडिया २०२४ चा राज्यस्तरीयआत्मासन्मान गौरव पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल सिद्धार्थ तायडे यांच्यावर मित्रमंडळी आणि हितचिंतक अशा अनेक क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे व पुढील कार्यासाठी शुभेच्छा मिळत आहे.