महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांच्यासंवाद दौऱ्याला रहिवाशांचा प्रचंड प्रतिसाद सरोवा वसाहतीतील पाणी प्रश्न सोडविणार

महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांच्यासंवाद दौऱ्याला रहिवाशांचा प्रचंड प्रतिसाद सरोवा वसाहतीतील पाणी प्रश्न सोडविणार

महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांच्यासंवाद दौऱ्याला रहिवाशांचा प्रचंड प्रतिसाद

मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) सरोवा वसाहत कांदिवली पूर्व येथील रहिवाशांशी संवाद साधण्यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आले असता त्यांना प्रचंड प्रतिसाद स्थानिक रहिवाशांनी दिला. उपस्थित जनसमुदायला ना. पियुष गोयल यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सरोवा वसाहतीतील पाणी व अन्य प्रश्नांसाठी मी पाठीशी असल्याचे अभिवचन दिले.

सरोवा संकुल येथे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचे आगमन होताच तेथील रहिवाशांनी फुले उधळून, औक्षण करून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर येथील भव्य सभेला संबोधित करताना पियुष गोयल यांनी म्हटले की देशाची अर्थव्यवस्था उंचावेल, प्रत्येक घटकाला रोजगार मिळेल, हर घर जलसह समाजाच्या इतरही समस्या जलद गतीने सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले. भविष्यात ‘उत्तर मुंबईला उत्तम मुंबई’ बनविण्यासाठी सर्वतोपरी योगदान देण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

तत्पूर्वी भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी संबोधित करताना म्हटले की, सरोवा संकुलातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असून तो पूर्णपणे सोडवणे ही आमची जबाबदारी आहे व आम्ही ते निश्चित करू, अशी ग्वाही दिली. तसेच उत्तर मुंबईतील नागरिकांसाठी लिलावती, नानावटी, रिलायन्सच्या धर्तीवर एक मोठे सुसज्ज रुग्णालय उभे करा, अशी मागणीही दरेकर यांनी केली. तर भाजपा चित्रपट आघाडीच्या उपाध्यक्षा निशा परूळेकर यांनी स्थानिक विषयांवर उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधले.

याप्रसंगी खासदार गोपाळ शेट्टी, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, भाजपा चित्रपट आघाडीच्या उपाध्यक्षा निशा परूळेकर, भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, जिल्हा सचिव मोतीभाई देसाई, मंडळ अध्यक्ष दिलीप उपाध्याय, ललित शुक्ला, दिलीप सावंत, बळीराम भोसले, आत्माराम कांबळी, सरोवा फेडरेशन व सरोवातील सर्व सोसायट्यांचे पदाधिकारी, भाजपा व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *