संविधान व लोकशाहीच्या रक्षणार्थ बहुजनांनो सज्ज रहा – फिरोज मुल्ला(सर)

संविधान व लोकशाहीच्या रक्षणार्थ बहुजनांनो सज्ज रहा – फिरोज मुल्ला(सर)

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आत्मसन्मान गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

कोल्हापूर.. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना व संघर्षनायक मिडियाच्या वतीने जयंतीच्या पुर्व संधेला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मोठ्या प्रमाणात राजर्षी शाहू महाराज स्मारक येथे साजरी करण्यात आली . अध्यक्षस्थानी रुई ता. हातकणंगले चे माजी सरपंच व पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जयसिंगराव कांबळे हे होते .


प्रमुख पाहुणे म्हणून पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय नेते फिरोज मुल्ला(सर) उपस्थित होते . त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या तमाम भारतीय नागरिकांना मंगलमय शुभेच्छा देत ते म्हणाले की जयंती साजरी करत असताना त्यांच्या विचारांची व त्यांनी दिलेल्या संविधानाच्या जागराची जयंती साजरी केली पाहिजे .महापुरुषांना जातीमध्ये घट्ट करून ठेवू नये कारण महापुरुषांनी कधीच जात मानली नाही . त्यांनी जातीच्या पलिकडे जावून मानवता मध्य बिंदू ठेवून मानवादी धर्म कार्य केले . सर्व जातीधर्मातील लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली पाहिजे . कारण बाबासाहेबांनी दिलेल्या संविधाना मुळे आपण मनमुकळ्या पणाने भारत देशात वावरू शकतो याच्यात तिळमात्र शंका नाही . परंतु भारत देशात संविधान संपवण्याची भाषा काही संविधान विरोधी जातीयवादी लोक करत आहेत पण कोणाचा बाप संविधान संपवू शकत नाही . पण आपण गाफील राहता कामा नये संविधानाचे रक्षण करण्याची जवाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकांवर आहे हे विसरता कामा नये असे .फिरोज मुल्ला(सर) यांनी बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या जनसमुदायाला समोर मनोगत व्यक्त केले .

यावेळी शेतमजुरांचे नेते सुरेश सासने , रुई गावचे पहिले सरपंच विष्णुपंत तराळ (कुरुंदवाड ) , जेष्ट धम्म प्रचारक काका कुरणे , जवाहर साखर कारखान्याचे संचालक अभय कुमार काश्मिरे , आरपीआय आठवले जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ , पत्रकार उमेश जामसंडेकर (पालघर) चंद्रकांत भाट , बाळासाहेब कांबळे , पापालाल सनदी , प्रविण पवार , नितिन धनवडे ,शरद वाघवेकर , संभाजी चौगुले , राजेंद्र होळकर सिद्धार्थ तायडे (बुलढाणा ) तसेच ॲड महेश कांबळे , ॲड अरविंद पाटील, ॲड . ममतेश आवळे , ॲड . प्रमोद दाभाडे , ॲड . भिमसेन कांबळे, ॲड . प्रशांत कांबळे , ॲड . सादीक भोरे , ॲड . कोमल माने , ॲड . अमोल आवळे , ॲड . सिद्धांत कांबळे , ॲड .पुजा कांबळे, आदिच्या सह
आंबेडकरी चळवळीतील भिमसैनीकांचा, मान्यवरांचा अत्मसन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी गरीब सेनेचे संस्थापक अध्यक्ष सतिश भंडारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . विचारपिठावर ज्येष्ट पँथर डि. एस डोणे , राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय महामंत्री बाबा नदाफ ,महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजुर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सासने ‘सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता इंजि . महादेव कमलाकर , माजी समाज कल्यान सभापती शामराव गायकवाड ,ॲड राहुलराज कांबळे , दिगंबर सकट , सौ पुजा मोरे आदी उपस्थित होते
प्रारंभी स्वागत रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (एकतावादी )
पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे बेलेकर यांनी केले प्रास्ताविक पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी केले तर आभार डॉ विक्रम शिंगाडे यांनी मानले .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *