
डॉ विक्रम शिंगाडे यांना स्वराज्य क्रांती सेना पॅथर आर्मी, संविधानवादी विविध संघटना यांच्या वतीने दि 13 रोजी शाहु स्मारक भवण कोल्हापूर येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष जयसिंगराव कांबळे जिल्हा अध्यक्ष पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना, फिरोज मुल्ला संस्थापक राष्ट्रीय नेते पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना राष्ट्रीय अध्यक्ष-संतोष आठवले अशा अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानपत्र देऊन आत्मसन्मान समाजभूषण गौरव पुरस्काराने सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.
डॉ विक्रम शिंगाडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करत आहेत. रक्तदान शिबिर, महाआरोग्य शिबिराचे आयोजन करणे,व्रुक्षारोपण करणे, अनेक गरजु विद्यार्थाचे शालेय फी भरणे, संगणक प्रशिक्षण मोफत देणे, अनेक अनाथ आश्रमाला भेट देऊन अन्नधान्याची व्यवस्था करणे, कवी संमेलन आयोजित करणे, मराठी साहित्य संमेलन आयोजित करणे, अनेक समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणी जणांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करणे, गरजु महिलांना साड्या वाटप करणे तसेच सर्वात मोठा उपक्रम म्हणजे मोफत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे, अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देणे, सामाजिक कार्यासाठी न्याय हक्कासाठी अनेक ठिकाणी आंदोलन करुन न्याय मिळवून देणे, शासकीय योजणा गरजु लोकांपर्यंत पोहचवणे असे अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम ते गेली अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे करत आहेत. त्या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना अनाथांची माय सिंधुताई सपकाळ तसेच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री डी.सदानंदगौंडा तसेच प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे तसेच पुणे येथील चोरडिया कॉलेजचे संस्थापक डॉ संजय चोरडिया अशा अनेक दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांना राज्यस्तरीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असे एकुण तीनसे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच चेन्नई युनिव्हर्सिटी वतीने सामाजिक क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी देखील प्राप्त झाली आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन स्वराज्य क्रांती सेना यांच्या वतीने आत्मसन्मान समाजभूषण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी डी एस डोणे व्रुतपत्र संपादक, दिगंबर सकट, राहुलराज कांबळे असे अनेक मान्यवर उपस्थित होते. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम उत्साहात पार पडला.