डॉ. सचिन आ. निटवे यांना इंडियन ऑयकॉन अवार्ड प्राप्त !
काईस्टकाफ्ट प्रॉडक्शन एल्. एल्. पी. या संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या विविध नामवंत पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यामध्ये डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे, अनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज, धरणगुत्तीचे प्राचार्य डॉ. सचिन आण्णासाहेब निटवे यांना इंडियन ऑयकॉन अवार्ड २०२४ मिळाला. सदरचा पुरस्कार हा त्यांच्या शैक्षणिक व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी करण्यात आलेल्या योगदानासाठी देण्यात आला. डॉ. सचिन निटवे यांनी आजअखेर ७ पेटेंट, राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय जरनल मध्ये ७२ इतके शोधनिबंध व ४ पुस्तके प्रकाशित केली आहेत. तसेच त्यांनी विविध महाविद्यालयातील विदयार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्याने दिलेली आहेत.
सदरचे अवार्ड मिळाल्यानंतर डॉ. सचिन निटवे यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. विजयराज मगदूम आणि उपाध्यक्षा व सेक्रेटरी अॅड. डॉ. सौ. सोनाली वि. मगदूम यांनी केले. तसेच महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनींही अभिंनदन केले.