कोल्हापूर जिल्ह्यात आर पी आय खरात गटात नाराजीचा सुर

कोल्हापूर जिल्ह्यात आर पी आय खरात गटात नाराजीचा सुर

कोल्हापूर जिल्ह्यात आर पी आय खरात गटात नाराजीचा सुर

हातकणंगले लोकसभा व कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील रिपब्लिकन पक्ष खरात गटाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत असे दिसून येते राज्यात महायुतीचे चित्र स्पष्ट असताना यामध्ये भाजपा, शिंदे गट शिवसेना, राष्ट्रवादी अजित दादा पवार गट, तसेच आर पी आय ए आठवले गट, आर पी आय कवाडे गट,जनसुराज्य शक्ती पक्ष, मनसे, ताराराणी आघाडी असे आणि ईतर पक्ष मिळून महायुती असताना आर पी आय खरात गटाच्या कार्यकर्त्यांना दोन्ही मतदार संघात सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसल्याने आर पी आय खरात गटात नाराजीचा सुर उमटला आहे आर पी आय खरात गट हा राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचा मित्र पक्ष आहे जिल्ह्यात व हातकणंगले लोकसभा मतदार संघात भरपूर प्रमाणात कार्यकर्ते असून देखील कोणत्याच प्रचार सभा ठिकाणी खरात गटाचे नेतृत्व करण्याची संधी मिळत नसल्याने नाराजी पसरली आहे तरी देखील खरात गटाचे सर्वेसर्वा आदरणीय सचिन खरात यांच्या आदेशानुसार युती धर्म पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत असे असताना दोन्ही लोकसभा मतदारसंघात आर पी आय खरात गटाचे पदाधिकारी प्रचार करताना दिसून येत आहेत तरीदेखील दोन्हीही उमेदवारांनी खरात गटाची दखल घेतलेली दिसून आली नसून तसेच सन्मानपूर्वक वागणूक न मिळाल्याचे दिसून येते आहे असे कार्यकर्त्यांचे मत आहे तरीदेखील राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी मित्र पक्ष म्हणून खरात गट कोल्हापूर जिल्हा पूर्ण तकतीनिशी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून मा संजय मंडलिक यांच्या विजयासाठी भक्कम पाठीशी राहणार आहे, तसेच हातकणंगले लोकसभा मतदार संघातून धैर्यशील माने दादा यांना पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी खरात गटाचा जोर कायम राहील, अशी माहिती प्राप्त झाली आहे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये चर्चा पार पडली यावेळी उपस्थित पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष हर्षवर्धन आचार्य, कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे प्रभारी व कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आकाश कांबळे, तसेच हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे प्रभारी व कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष हर्षदकुमार कांबळे, तसेच हातकणंगले तालुका अध्यक्ष अजित शिंदे, तसेच हातकणंगले तालुका कामगार आघाडी अध्यक्ष मा संतोष कोठावळे तसेच कोल्हापूर शहर अध्यक्ष विश्वास पोवार, तसेच हालसवडे शाखा अध्यक्ष पंचशील कांबळे, कागल शहर अध्यक्ष शैलेश कांबळे, गडहिंग्लज अध्यक्ष राजेंद्र कांबळे,प कोडोली अध्यक्ष अमोल कांबळे, पेठ वडगांव अध्यक्ष राज कांबळे, कुरुंदवाड अध्यक्ष सौरभ कांबळे, इचलकरंजी शहर अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, प कोडोली उपाध्यक्ष प्रवीण कांबळे, इस्लामपूर शहर महिला कामगार आघाडी कार्याध्यक्ष हर्षा बनसोडे मॅडम, शिरोली अध्यक्ष अल्पेश बनसोडे, राधानगरी अध्यक्ष सचिन कांबळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभा हलसवडे या गावांमध्ये पार पडली त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गटाचे युवा अध्यक्ष सिद्धार्थ घोडेराव हेही उपस्थित होते व सभेला मार्गदर्शन केले..

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *