अतिग्रे, परिसरात वटसावित्री पौर्णिमा महिलांनी उत्साहात साजरी केली
प्रतिनिधी शितल कांबळे
हातकणंगले तालुक्यातील , अतिग्रे,येथे महिलांनी वटसावित्री पौर्णिमा उत्साहात साजरी केली, मराठी संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्शन बांधुनी नात्यांचे बंधन करेन साता जन्माचे समर्पण असे संबोधत वट वृक्षाला सात फेऱ्या मारत जन्मो जन्मी हाच पती मिळुदे म्हणत एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी, एक फेरा दीर्घायुष्यासाठी, एक फेरा तुझ्या माझ्या अतूट आणि सुंदर नात्यासाठी अशीच असावी तुमची माझी साथ प्रत्येक क्षण हा नवी सुरुवात, थोडंसं भांडण थोडासा रुसवा असावा, असेच वाढो नात्यात गोडवा, असाच असुदे हातात हात, जन्मो जन्मी लाभावी तुमचीच साथ असे म्हणत मोठ्या उत्साहाने वटपौर्णिमा साजरी केली तसेच खास महिलांसाठी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला असून यावेळी अनेक महिलांनी सेल्फी चा आनंद लुटत हा सण साजरा केला.
Posted inकोल्हापूर