
रविवार दिनांक 30 जून रोजी सकाळी उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांची गटप्रवर्तक महिलांनी भेट घेऊन गटप्रवर्तक महिलांचे दरमहा दहा हजार रुपये मानधन वाढ व ज्या गटप्रवर्तकांची दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांचे सेवा समायोजन करावे याबाबतचे निवेदन दिले.
चर्चेमध्ये गटप्रवर्तक सुरभी भोसले,स्वाती वरवडेकर व साक्षी चव्हाण यांनी सांगितले की 19 जून 2024 रोजी आम्ही गटप्रवर्तक महिला प्रतिनिधी व कॉ शंकर पुजारी यांच्यासह श्री मिलिंद म्हैसकर यांना भेटून निवेदन दिलेले आहे. त्या संदर्भात तातडीने श्री उदयजी सावंत यांनी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री मिलिंद म्हैसकर यांच्याशी फोनवर चर्चा केली

.
उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांना श्री मिलिंद म्हैसकर यांनी असेही सांगितले की गटप्रवर्तकांच्या महिलांच्या मानधन वाढी संदर्भात या आठ दिवसांमध्ये निर्णय होईल.
श्री मिलिंद म्हैसकर यांनी उद्योगमंत्र्यांना असेही सांगितले की गटप्रवर्तकांच्या मानधन वाढीबद्दलची प्रोसेस पूर्ण होत आलेली असून याबद्दलचा लवकरच निर्णय होईल.
गटप्रवर्तक महिलांच्या समोरच उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री मिलिंद म्हस्कर यांना फोन लावून सकारात्मक चर्चा केल्याबद्दल गटप्रवर्तकानी उद्योग मंत्री यांचे आभार मानले.
रत्नागिरी जिल्ह्यातील पाली येथे रविवारी 30 जून रोजी श्री उदयजी सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे डीएसपी यांना फोन करून 2021 साली गटप्रवर्तक व आशा महिलांच्यावर महिलानी आंदोलन केले म्हणून घातलेल्या फौजदारी केसेस काढून टाकण्याबद्दलच्या सूचना दिल्या.
पालकमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देण्यासाठी गटप्रवर्तक प्रतिनिधी वेदिका गडचे, अश्विनी शेलार, शेजल भोसले, सुरभी भोसले, स्वाती वरवडेकर व साक्षी चव्हाण यांचा समावेश होता.
तसेच फौजदारी केसेस काढण्यासंदर्भात शिष्टमंडळामध्ये आशा प्रतिनिधी विद्या भालेकर, मंगल जाधव, संचिता म्हैसकर इत्यादींचा समावेश होता.
रत्नागिरी जिल्ह्यातील गटप्रवर्तक प्रतिनिधी व आशा प्रतिनिधीनी स्वतः पुढाकार घेऊन पालकमंत्र्यांची भेट घेऊन गटप्रवर्तकाना न्याय मिळण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य आशा,गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कॉ सुमन पुजारी यांनी त्यांचे अभिनंदन व स्वागत केले आहे.