भर पावसात मुंबईकर पाण्यासाठीच रस्त्यावर !

भर पावसात मुंबईकर पाण्यासाठीच रस्त्यावर !

    मुंबई -(विशेष प्रतिनिधी उदय नरे) 

मुंबई उपनगरातील कांदिवली समतानगरमध्ये पाण्यासाठी रहिवाशांची परवड झाल्याने हजारे नागरिक रस्त्यावर उतरले. 25 मार्च पासून रहिवाश्यांना 15 मिनिटे पाणी येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. बिल्डर एसडी कॉर्पोरेशनच्या विरोधात आंदोलन करून
त्यांना जाब विचारण्यासाठी रहिवाशांनी विकासाशी संपर्क साधला असता बिल्डर एसडी कॉर्पोरेशनमधून दिली जाता आहे उडवा उडवीची उत्तरे दिली गेल्याने नागरिक संतप्त झाले. वारं वार विन- विण्याकरून पाणी दिले जात नाही असा नागरिकांचा आरोप आहे.
म्हाडा इमारतीच्या पुर्नविकास झालेल्या इमारतीला कमी पाणी देत असल्याचा आरोप करून नागरिकांनी स्थानिक नेते भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांच्याशी संपर्क साधला असता यांनाही लोकांनी पिटाळून लावले अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

म्हाडा इमारतीचा पुनर्विकास करून सरोवा कॉम्प्लेक्स बांधण्यात आला. या समता नगरच्या 32 मजली सरोवा इमारत कॉम्पल्समध्ये 2000 कुटुंबे राहतात. आजूबाजूच्या बांधलेल्या नवीन इमारतीत बिल्डर 24 तास पाणी देत असल्याचा दावा संतप्त नागरिक करत आहेत.सरोवा, ठाकूर विलेज, कांदिवली पूर्व, मुंबई येथील शहापूर्जी पालनजी प्रकल्प विकासक यांच्या विरोधात भर पावसाळ्यात पाण्याच्या प्रश्नासाठी झालेल्या आंदोलनामुळे सत्ताधारी पक्षाचे तोंडचे पाणी पळण्याची शक्यता वाढली आहे अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरीक विजय पुजारी यांनी दिली आहे. तर केवळ भाडखाऊ दलाल व स्थानिक नेतेच या प्रश्नासाठी जबाबदार आहे अशी संतप्त प्रतिक्रिया संतोष आरेकर यांनी दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *