
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय गेट समोर आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जोरदार घोषणा देऊन आंदोलन सुरुवात करण्यात आले. त्यानंतर सांगलीचे जिल्हाधिकारी श्री डॉ राजा दयानिधी यांना निवेदन देऊन वालचंद महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन मिळत नाही हे कॉलेज सर्व कायदे पायदळी तुडवत आहेत. म्हणून या कॉलेजवर कारवाई करा अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात जिल्हाधिकारी श्री डॉ राजा दयानिधी यांनी सांगितले की नियमानुसार कर्मचाऱ्यांना पगार देण्याबाबत कॉलेजला तातडीने आदेश करीत आहे
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय हे अनुदानित महाविद्यालय असून सध्या या नावाजलेल्या आणि सर्वात जुन्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 98 पदे तृतीय व चतुर्थ श्रेणी मधील रिक्त आहेत .ती पदे वर्षानुवर्षे जाणीवपूर्वक भरली जात नाहीत. इतकेच नव्हे तर रोस्टर पद्धतीचा अवलंब या महाविद्यालयामध्ये अजिबात केला जात नाही.
विशेष म्हणजे मागील वीस वर्षापासून लॅब असिस्टंट, क्लार्क आणि इतर पदावर काम करणारे 26 कर्मचारी हे या महाविद्यालयाच्या रिक्त पदांच्या वर काम करीत आहेत.
वास्तविक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे रिक्त पदांच्या वर कर्मचारी काम करतात त्यांना समान कामाला समान वेतन दिले पाहिजे. परंतु या महत्त्वाच्या तत्त्वाची अंमलबजावणी या कॉलेजमध्ये अजिबात केली जात नाही .
वालचंद महाविद्यालयामध्ये कायम कर्मचाऱ्यांना 85 ते 90 हजार रुपये दरमहा वेतन दिले जाते. परंतु कंत्राटी कर्मचाऱ्यांना फक्त पंधरा हजार रुपये दरमहा वेतन 2017 सालापासून आजपर्यंत दिले जात आहे. अशाप्रकारे जवळजवळ या कर्मचाऱ्यांच्या कडून फुकटच राबवून घेऊन या महाविद्यालयाचे व्यवस्थापक या कामगारांचे अत्यंत शोषण करीत आहेत.
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करत असताना पाच ते सहा रिक्त पदांच्या वर एक एक कंत्राटी कर्मचारी काम करीत आहे. किंबहुना काही विभागामध्ये एकाच कामगारावर लॅब असिस्टंटला क्लार्क व शिपाई ही सर्व कामे करायला लागत आहेत.
तसेच 2017 सालामध्ये सांगली औद्योगिक न्यायालयाने या महाविद्यालयास असा आदेश केलेला आहे की या 26 कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे वेतन द्या परंतु न्यायालयीन आदेश सुद्धा पायदळी तुडवण्याचे काम वालचंद महाविद्यालयामार्फत सुरू आहे. म्हणूनच जोपर्यंत समान कामाला समान मिळते मिळत नाही तोपर्यंत संस्था नियुक्त कंत्राटी कर्मचारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच राहणार आहे. असे कामगारांच्या समोर बोलताना दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य लाल बावटा जनरल कामगार युनियनचें जनरल सेक्रेटरी कॉ शंकर पुजारी यांनी घोषित केलेले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व श्री गणेश
कुंभार, प्रदीप कांबळे, विनोद भंडारी, प्रवीण वनखडे, संजय बंडगे, सुरेंद्र आंबी इत्यादी आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत.
मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.