नामांकित सांगली वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अत्यंत महत्त्वाचे काम करणारे कर्मचारी जे लॅब असिस्टंट, लॅब अटेंडंट, क्लार्क व शिपाई इत्यादी कर्मचारी 138 रिक्त पदांच्या वरील चार चार पाच पाच लॅब असिस्टंट चे काम करीत आहेत.
संस्थानियुक्त या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दररोज चार ते पाच कर्मचाऱ्यांचे काम लादून त्यांच्यावर कामवाढ व तानवाढ लादली आहे.
या महाविद्यालयातील जे कायम कर्मचारी आहेत त्यांना दरमहा 85000 ते 90 हजार इतका पगार मिळतो. आणि वरील कर्मचाऱ्यांना मात्र दरमहा फक्त पंधरा हजार रुपये पगार दिला जातो. अशाही प्रकारे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे व्यवस्थापन कर्मचाऱ्यांचे अत्यंत शोषण करीत आहेत. हे अति झाल्याने शेवटी चार जुलैपासून बेमुदत कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलेले आहे.
सांगली औद्योगिक न्यायालयामार्फत २०१७ साली वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयास आदेश करण्यात आलेला आहे की त्यांनी नियमानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे. परंतु न्यायालयीन आदेशाचा अवमान करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दरमहा फक्त पंधरा हजार रुपये पगार दिला जातो.
त्यामुळे जोपर्यंत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियमानुसार वेतन ठरवले जात नाही तोपर्यंत काम बंद ठेवून आंदोलन सुरूच राहील असे कामगार संघटना प्रतिनिधींनी घोषित केलेले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व शिक्षकेतर कर्मचारी राहुल चिरोटे ,प्रवीण गायकवाड ,दिलीप कोळेकर, सारिका पवार ,विनोद भंडारी, गणेश कुंभार ,प्रदीप कांबळे, वर्धमान पाटील इत्यादी करीत आहेत.
सांगलीचे जिल्हाधिकारी यांनी सुद्धा वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयास नियमानुसार वेतन द्यावे असा आदेश केलेला आहे. परंतु जिल्हाधिकारी यांचा आदेश व न्यायालयीन आदेश पायदळी तुडवून वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील व्यवस्थापक शिक्षकेतर कर्मचारी यांचं रोज क्रूर थट्टाच करीत आहेत.
सध्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोर शिक्षकेतर कर्मचारी यांनी हे आंदोलन चार जुलैपासून दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू ठेवलेले आहे. जर व्यवस्थापकानी कायदा पाळण्यास नकार दिल्यास शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाविद्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असे पत्रक महाराष्ट्र राज्य लाल बावटा जनरल कामगार युनियन चे ज्येष्ठ कामगार नेते कॉ शंकर पुजारी यांनी प्रसिद्धीस दिलेली आहे.