कोल्हापूर, दि. १८ (प्रतिनिधी) राजारामपुरी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना सहा. आयुक्त साळे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी अन्यायाविरुद्ध लढा देत,आपल्या साहित्याच्या माध्यमातून श्रमिक कष्टकरी शोषितांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवला.तसेच
पृथ्वी ही शेष नागाच्या फण्यावर तरली नसून, कष्टकरी, श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे. समाजक्रांतीची मशाल पेटविणारे, कष्टकरी , शोषितांच्या उत्थानासाठी अण्णाभाऊंनी आपले आयुष्य खर्ची घातले असे मनोगत साळे यांनी व्यक्त केले.
यावेळी निवृत्त पोलीस उप अधीक्षक ॲड. आर.आर.पाटील परिवर्तनचे अमोल कुरणे, बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ साठे, दाऊद भोरे , निवास सूर्यवंशी, डॉ. प्राजक्ता सूर्यवंशी, चंद्रकांत दिंडे, संभाजी चौगुले, को.म.न.पा. आरोग्य निरीक्षक भूमी कदम , बैजू कांबळे, टी.एस. कांबळे आदी विविध संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा ५५ वा स्मृतिदिन संपन्न
