गेली अनेक वर्षे लाट एज्युकेशन सोसायटी संचित न्यू इंग्लिश स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज लाट विद्यार्थ्यांच्या विकासासाठी चांगल्या व शिस्तीच्या शिक्षणासाठी अब्दुल लाट पंचक्रोशीतच प्रसिद्ध आहे. इथे विद्येची माता सावित्रीबाई फुले यांना मानले जाते. प्रा.डाॅ. देवेंद्र कांबळे सर व त्याचे सर्व शिक्षक कर्मचारी हे सतत संस्थेचा व विद्यार्थी यांचा विकास डोळ्यासमोर ठेवून नेहमी नवनवीन योजना, प्रयोग करत असतात. त्यातलाच एक भाग म्हणून साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीला गांवभर ग्रंथ दिंडी काढून वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी व त्याचे प्रबोधन करण्याचा नेहमी प्रयत्न असतो.या वर्षी साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शाळेसाठी एक पुस्तक ही एक व्यापक कल्पना घेऊन काम करत आहेत तसेच त्यांनी आवाहन ही केलं आहे कि सुसज्ज ग्रंथालयासाठी एक पुस्तक शाळेसाठी देऊन सहकार्य करावे. शिक्षण, वाचन आणि भावी पिढ्यांचा विचार करणारी जागृत नागरिक निश्चित या आवाहनाला साद देतील.
Posted inकोल्हापूर
न्यू इंग्लिश स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज च्या प्राचार्य डॉ.देवेंद्र कांबळे यांचा अभिनव उपक्रम एक पुस्तक शाळेसाठी..
