विशाळगड अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण देत जातीय दंगल घडवीणाऱ्या व्यक्तीवर रासुका लावून तात्काळ अटक करा..फिरोज मुल्ला (सर )

विशाळगड अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण देत जातीय दंगल घडवीणाऱ्या व्यक्तीवर रासुका लावून तात्काळ अटक करा..फिरोज मुल्ला (सर )


पुणे : पॅन्थर आर्मी स्वराज क्रांती सेनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला (सर )यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी महाराष्ट्र राज्यात माणुसकीला कालिंबा फासणारी घटना घडत आहे त्याच्या निषेध करून निवेदन देण्यात आले विशाळगड अतिक्रमण प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाअतिक्रमण मुक्ती आंदोलन करून मुस्लिम समाजावरअत्याचार करणारे संभाजीराजे व त्यांचे संघटनेचे कार्यकर्ते यांच्यावर रासुका अंतर्गत कारवाई करून तात्काळ अटक करण्यात यावी .विशाळगडावर हिंदू व मुस्लिमांचे अतिक्रमण असताना केवळ मुस्लिम समाजावर अत्याचार केले गेले. घरांवर-प्रार्थनास्थळांवर दगडफेक, तोडफोड, महिला व लहान मुलांवर अत्याचार केले गेले हे पुरोगामी कोल्हापूरला न शोभणारे आहे. या समाजकंटकांचे नेतृत्व करणारे संभाजीराजे व स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी व याचे सुत्रधार पुण्याचा रविंद्र पडवळ यांच्याकडून नियोजनपूर्वक यासाठी रसद पुरवली गेली.जमावबंदी असताना मोर्चा निघालाच कसा, अतिक्रमणविरोधी मोर्चा असताना हल्ला का केला गेला, गजापूरमध्ये कोणताही विषय नसताना तेथील मुस्लिम समाजावर अत्याचार का केले गेले. विशाळगडावर जाण्यासाठी एकच रस्ता आहे, तेथे पोलीसांनी समाजकंटकांना हत्यारासह सोडले, नागरिकांना सुरक्षा न देता बघ्याची भूमिका घेतली.तरी संघटनेचे नेते, कार्यकर्ते यांच्यावर रासुका लाऊन सरकारी कामात अडथळा, महिलांचे विनयभंग, घरफोडी, लुटालुट,, प्रार्थनास्थळावर दगडफेक, धार्मिक ग्रंथ पेटविणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी
या प्रकरणी पोलीसांनी बघ्याची भूमिका घेतली त्यामुळे कोलहापुर पोलीस अधीक्षकांची बदली करावी
अन्यथा पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र भर उग्र आंदोलन करण्यात येईल यावेळी महिला प्रदेश कार्याध्यक्ष सौ. सिंधुताई तुळवे,सिंदीपभाऊ शेंडगे,महिला उपाध्यक्ष सौ.विजयाताई खटाळ,पुणे शहर उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कुंबळे,हसीमभाई खान, रईसभाई खान उपस्थिती होते

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *