विषय :- सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिनांक 14 जुलै 2024 रोजी घेतलेला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना व वारकरी महामंडळ स्थापन करणे हे निर्णय तात्काळ रद्द करावे तसेच सामाजिक न्याय विभागातून विशेष सहाय्य विभाग बाजूला करून स्वातंत्र विभागाची निर्मिती करावी..
फिरोज मुल्ला (सर )
पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने पणे जिल्हाधिकारी यांना संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला (सर ) यांच्या नेतृवाखाली निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्य शासन सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिनांक 14 जुलै 2024 रोजीमुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना व वारकरी महामंडळ स्थापन करणे असे दोन शासन निर्णय काढण्यात आले .या शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीसाठी असलेल्यानिधीतून संबंधित मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना व वारकरी महामंडळ यांना लाभ होणार आहे सामाजिक न्याय विभागाचा निधी हा अनुसूचित जातीसाठी खर्च करणे अपेक्षित असते असे असताना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना व वारकरी महामंडळ या सामाजिक न्याय विभागाचा निधी वापरणे हे अनुसूचित जाती समाजावर आर्थिक अन्याय आहे मुख्यमंत्रीतीर्थ दर्शन योजना राबविण्यासाठी सरकारकडे पर्यटन खाते पर्यटन महामंडळ व पर्यटन महासंचालनालय आहे त्या मार्फत या योजना राबवणे गरजेचे आहेअनुसूचित जातीच्या परदेशी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती भेटत नाही तसेच राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही उच्चशिक्षित पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती मिळत नाहीरमाई घरकुल योजनेस निधी अपुरा पडतो ॲट्रॉसिटी पीडितग्रस्तांना वेळेत नुकसान भरपाई मिळत नाही आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडपणा अनुदान मिळत नाही तसेच भूमिहीन शेतमजुरांना शेतमालक करणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेस योग्य तो निर्णय मिळत नाही असे अनेक स्वरूपाचे आर्थिक अन्य महाराष्ट्र राज्य शासन अनुसूचित जाती समूहा वर करत आहेअनुसूचित जातीच्या निधीवर सरकार पुरस्कृत दरोडा टाकण्याचे काम शासन स्तरावर सुरू आहे 14 जुलै 2024 चा शासन निर्णय त्वरित रद्द करावा व सामाजिक न्याय विभागातून विशेषतः विभाग हे बाजूला करून स्वतंत्र विभागामार्फत कामकाज सुरू करावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र आंदोलन पॅंथर आर्मी स्वराज क्रांती सेनेच्या वतीने करण्यात येईल याची नोंद घ्यावी यावेळी महिला प्रदेश कार्याध्यक्ष सौ सिंधुताई तुळवे, पुणे शहर उपाध्यक्ष सौ विजयाताई खटाळ संदीपभाऊ शेंडगे, पुणे शहर उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कुंबळे, हसीमभाई खान, रईसभाई खान उपस्थिती होते