
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त श्री शुभम गुप्ता यांना 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये आशा आणि आयुक्तांना असे सांगितले की नोव्हेंबर महिन्यापासून अशा महिलांना केलेल्या पगाराचा सुद्धा पगार न मिळाल्यामुळे सध्या अलाखीचे जीवन जगावे लागत आहे या पगार मिळण्याबाबत पाठपुरावा करायचे आणि शासनाकडे कळवण्याचे आश्वासन आयुक्त श्री शुभम गुप्ता यांनी महिलांना दिले.
तसेच सर्व आशाने आयुक्तांना असे सांगितले की अशांना पगार वाढलेला आहे परंतु प्रत्यक्षात मिळालेला नसून सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी अशांना अत्यंत त्रास देत असून त्यामुळे अशांना भयंकर मानसिक ताण सहन करावा लागत आहे जी कामे ठरवून दिली नाहीत ती काम सुद्धा केलीच पाहिजेत रविवारी सुद्धा कामावर आली पाहिजे अशी शक्ती अधिकाऱ्यांच्या करून केली जात असून रविवारी सुद्धा कामावरून आल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जात आहे तरी अशा पद्धतीने बेकायदेशीर वागणे करून महिलांच्यावर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वर त्वरित कारवाई करावी अशी आयुक्तांच्याकडे सर्व महिलांनी मागणी केली.
याबाबत आयुक्त श्री शिवम होता यांनी असे आश्वासन दिले की महिलांच्या या तक्रारी बद्दल लवकरच महानगरपालिकेचे उपायुक्त संयुक्त बैठक घेतील आणि समस्या सोडवतील असे आश्वासन दिले.
शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र राज्य आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ शंकर पुजारी, अर्चना कलगुडगी, अर्चना भोई, मनीषा सुतार, संगीता हेरले, साधना गोंधळे, धनश्री आत्मकुंडे, शीतल कामत, आशू जयगोंड, उज्वला कडोले इत्यादींचा शिष्टमंडळामध्ये समावेश होता.