मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघनिहाय अशासकीय सदस्यांची नेमणूक

कोल्हापूर, दि.: महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबुत करण्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र राहतील. या योजनेंतर्गत पात्र महिलेचा ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तिच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या खात्यात 1500 रुपये रक्कम पात्र महिलेस देण्यात येईल असे शासन निर्णयामध्ये नमुद करण्यात आले आहे.
या पात्र महिला निवडण्यासाठी विविध यंत्रणेची नेमणुक करण्यात आलेली आहे. यामध्ये विधानसभा क्षेत्रनिहाय समितीमध्ये तीन अशासकीय सदस्य असतील पैकी एक अध्यक्ष व दोन अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्याबाबत सूचित केलेले आहे. त्याअनुषंगाने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघनिहाय अशासकीय सदस्यांची पुढीलप्रमाणे नेमणूक करण्यात आली आहे.
चंदगड-गडहिंग्लज-आजरा विधानसभा मतदार संघ समिती
समितीमधील पदनाम व नाव पुढीलप्रमाणे अध्यक्ष- आमदार राजेश नरसिंगराव पाटील, अशासकीय सदस्य- श्रीम.ज्योती दिपक पाटील व बापूसाहेब वाळू घव्हाळे.
राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदार संघ समिती
समितीमधील पदनाम व नाव पुढीलप्रमाणे अध्यक्ष- आमदार प्रकाश आनंदराव आबिटकर, अशासकीय सदस्य- राहूल बजरंग देसाई व सुनिल शिवराम कांबळे.
कागल, गडहिंग्लज विधानसभा मतदार संघ समिती
समितीमधील पदनाम व नाव पुढीलप्रमाणे- अध्यक्ष- आमदार तथा पालकमंत्री हसन सोमियालाल मुश्रीफ,
अशासकीय सदस्य- नामदेवराव तुकाराम मेंडके व यशवंतराव (बॉबी) जयवंतराव माने.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघ समिती
समितीमधील पदनाम व नाव पुढीलप्रमाणे- अध्यक्ष- अमल महादेवराव महाडीक, अशासकीय सदस्य
आप्पासाहेब संभाजी धनवडे व प्रकाश प्रल्हाद सुर्यवंशी.
करवीर विधानसभा मतदार संघ समिती
समितीमधील पदनाम व नाव पुढीलप्रमाणे- अध्यक्ष- चंद्रदीप शशिकांत नरके, अशासकीय सदस्य
शिवाजीराव नाना देसाई व हंबीरराव दिनकरराव पाटील.
कोल्हापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघ समिती
समितीमधील पदनाम व नाव पुढीलप्रमाणे- अध्यक्ष- श्रीम. सिध्दी गणेश रांगणेकर, अशासकीय सदस्य
सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम व आदिल बाबू फरास.
शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदार संघ समिती
समितीमधील पदनाम व नाव पुढीलप्रमाणे- अध्यक्ष- आमदार डॉ. विनय विलासराव कोरे (सावकर) अशासकीय सदस्य निवास शामराव ढोले व ओंकार महादेव चौगुले.
हातकणंगले विधानसभा मतदार संघ समिती
समितीमधील पदनाम व नाव पुढीलप्रमाणे- अध्यक्ष- अविनाश सहदेव बनगे अशासकीय सदस्य-
अशोकराव कोंडीराम माने व हर्षवर्धन वसंतराव चव्हाण.
इचलकरंजी शहर विधानसभा मतदार संघ समिती
समितीमधील पदनाम व नाव पुढीलप्रमाणे- अध्यक्ष- आमदार प्रकाश कल्लापाण्णा आवाडे अशासकीय सदस्य- विठ्ठल पुंडलिक चोपडे व मोहन पांडूरंग मालवणकर.
शिरोळ विधानसभा मतदार संघ समिती
समितीमधील पदनाम व नाव पुढीलप्रमाणे- अध्यक्ष- आमदार डॉ.राजेंद्र शामगोंडा पाटील (यड्रावकर),
अशासकीय सदस्य अमरसिंह शिवाजीराव माने -पाटील व राजवर्धन विठ्ठलराव नाईक – निंबाळकर या प्रमाणे समितीची रचना आहे.
विधानसभा मतदार संघ समिती मधे विधानसभा मतदार संघातील तहसिलदार, गट विकास अधिकारी, मुख्यधिकारी नगरपरिषद/नगरपंचायत हे सदस्य म्हणून यांची नियुक्त करण्यात आली आहे. तसेच विधानसभा मतदारसंघ इचलकरंजी विधानसभा मतदार संघ, कोल्हापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघ व कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघ या मतदार संघात सदस्य म्हणून अतिरिक्त आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका, उपआयुक्त कोल्हापूर महानगरपालिका व उपआयुक्त इचलकरंजी महानगरपालिका सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्राप्त झालेल्या संभाव्य पात्र लाभार्थ्याना विधानसभा मतदार संघ समिती अंतिम मंजुरी देतील. त्यानंतर अंतिम मंजूर करण्यात आलेली यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपुर्द करण्यात येईल. जिल्हाधिकारी हे त्यांच्या यंत्रणेव्दारे अंतिम पात्र महिला लाभार्थ्यांची यादी आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांना सादर करतील.