.एप्रिल 2024 पासून दरमहा दहा हजार रुपये आशा महिलांचेआज पर्यंतचे थकित मानधन आठ दिवसात मिळेल. राष्ट्रीय आरोग्य अभियाना कडून आश्वासन!

13 मार्च 2024 रोजी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी आशा महिलांच्यासाठी दरमहा पाच हजार रुपये मानधन वाढीची घोषणा केली. परंतु प्रत्यक्षात मात्र अद्याप झालेली मानधन वाढ मिळालेली नाही. एप्रिल 2024 पासून पूर्वीच मानधन दरमहा 5000 रुपये आणि नोवेंबर 2023 पासून पाच हजार रुपये मानधन वाढ करण्यात आलेली आहे ही सर्व रक्कम अजूनही आशा महिलांना न मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील आशा महिलांना सध्या उपासमारी मध्ये जीवन जगावे लागत आहे.
मानधन वाढ आशा महिलांना झाली म्हणून संबंधित अधिकारी आशा महिलांच्यावर दररोज काम वाढ लादत आहेत. शिवाय ऑनलाइन कामाचे साहित्य न देताच ऑनलाईन कामाची जबरदस्ती केली जात आहे.
इतकेच नव्हे तर ज्या कामाचा मोबदला दिला जात नाही अशी सुद्धा कामे अशा महिलांनी फुकट करायला पाहिजेत असा प्रयत्न सुरू आहे.
अशा प्रकारे आशा महिलांना एक प्रकारे वेठबिगारासारखे सध्या राबवून घेतले असून घेतले जात असून या महिलांचे भयानक शोषण होत आहे.
यासंदर्भात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहाय्यक संचालक श्री सुभाष बोरकर यांच्याबरोबर तारीख 29 जुलै रोजी कॉ शंकर पुजारी यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली असता श्री सुभाष बोरकर यांनी सांगितले की या आठ दिवसांमध्ये थकीत मानधन आशा महिलाना मिळेल.
अर्थात असे न झाल्यास महाराष्ट्रातील आशा महिलांना मात्र जोरदार आंदोलन करावे लागेल याची तयारी करावी.
असे आवाहन करणारे पत्रक महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कॉ सुमन शंकर पुजारी यांनी पत्रक प्रसिद्धस दिलेले आहे.

