अब्दुल लाट ग्रामपंचायत मासिक मीटिंग बोलवण्यात आली होती. त्या मासिक मीटिंगमध्ये ग्रामपंचायत सदस्य उपस्थित झाले असता ग्रामसेवक सरपंच काही महिन्यापूर्वी पाटील मळा शाळेसमोर पन्हाळगटार मंजूर झाली होती. ती न करताच त्या गटारीचे बिले परस्पर सरपंच, ग्रामसेवक व पंचायत समितीचे अभियंता यांच्या संगनमताने ठेकेदाराने परस्पर टक्केवारी देऊन काढली बिलेआणि नागरिकांच्या व ग्रामपंचायत सदस्याच्या डोळ्यात धुळ फेकण्यात आले या अनुषंगाने आजच्या त्या पाटील मळा शाळेसमोरच्या गटारी च्या प्रकरणाची कुणकुण लागताच काही सदस्यासोबतच सरपंच, ग्रामसेवक मीटिंग मधून पळ काढून ठेकेदाराला सांगून युद्ध पातळीवर काम करण्याचा फसवा प्रयत्न करण्यात आला. वर्षा कदम, वर्षा पाटील, क्षमा ठिकणे, राधिका भाट ,जितेश पाटील, अभी पाटील, सुरेश बेडकळे या ग्रामपंचायत सदस्याने संबंधित अधिकाऱ्यांना निरोप देऊन मीटिंग कंटिन्यू करा अशी विनंती केली. तरी देखील त्यांना दाद न देता ते तेथे आले नाही. म्हणून या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतच्या पायऱ्यावर अडीच तीन वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली आणि मग संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून प्रत्यक्ष कामावर जाऊन ते काम बंद पाडले ही घटना ग्रामसचिवालयाच्या आवारातील सर्व नागरिक व ज्या ठिकाणी गटार होणार त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी पाहिली आणि चर्चेला उधाण आलं गलतन कारभार असा किती ग्रामपंचायत मध्ये आहे. गलतान कारभाराची शंका कुशंका नागरिकांमध्ये होऊ लागली ही स्टंटबाजी भ्रष्ट कारभाराच्या विरोधासाठी की मेवा मिळवण्यासाठी याही चर्चेला नागरिकांतून जोर आहे.

