मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळा कुर्ला येथील पंंतवालावकर हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्यातील एक अग्रेसर व शैक्षणिक जगतात दोन हजार कोटीहून अधिक आर्थिक व्यवहार यशस्वीपणे सांभाळणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून गेली अनेक वर्षे चंद्रकांत पाटील कार्यरत आहेत. संस्थेच्या संचालक मंडळाने व मित्र परिवारातर्फे वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते.
कर्तव्यदक्ष, धैर्यशील , वक्तशीर, व संवेदनशील असलेल्या चंद्रकांत पाटील सरांच्या गुणांमुळे संस्थेने प्रगती केली असे भाष्य संचालक मंडळाने व्यक्त केले.
आपल्या कुटुंबाची साथ व शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास या मुळेच मी यशस्वीपणे सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची भरारी घेऊ शकलो असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील सरांनी सत्कार सोहोळ्याच्या प्रसंगी केले. शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे,मुंबई अध्यक्ष अजित चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे शिक्षक आघाडीचे राजू बंडगर, शिक्षक क्रेडिट सोसायटीचे संचालक मंडळ, सभासद, राजकीय, सामाजिक तसेच सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर या अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थीत होते.
