जिल्ह्यातील सर्व विभागांनी मंजूर पदांच्या पाच टक्के पदे कौशल्य विकास विभागाच्या पोर्टलवर तात्काळ नोंदवावीत-जिल्हाधिकारी अमोल येडगे

जिल्ह्यातील सर्व विभागांनी मंजूर पदांच्या पाच टक्के पदे कौशल्य विकास विभागाच्या पोर्टलवर तात्काळ नोंदवावीत-जिल्हाधिकारी अमोल येडगे

जिल्ह्यातील सर्व विभागांनी मंजूर पदांच्या पाच टक्के पदे कौशल्य विकास विभागाच्या पोर्टलवर तात्काळ नोंदवावीत
-जिल्हाधिकारी अमोल येडगे

  • मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन
  • मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील युवकांना सहा महिन्यांसाठी मिळणार रोजगार
  • जिल्ह्यात ५०० हून अधिक युवकांना शासकीय कार्यालयात प्रशिक्षणाची संधी; कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा परिषदेत सर्वाधिक पदे

कोल्हापूर, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत युवकांना 6 महिन्यांसाठी रोजगार उपलब्ध करुन देवून या योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागातील मंजूर पदांच्या पाच टक्के पदे कौशल्य विकास विभागाच्या महास्वयं पोर्टलवर तात्काळ नोंदवावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून विद्या वेतनासह शासकीय कामाचे प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक व पात्र युवकांनी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल भिंगारे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय माळी, कौशल्य विकास अधिकारी संगिता खंदारे तसेच विविध विभागांचे अधिकारी दूरदृश्यप्रणाली द्वारे उपस्थित होते. या बैठकीनंतर पुणे महसुल विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागातील सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्या समवेत दूरदृष्टी प्रणाली द्वारे बैठक घेऊन या योजनेच्या अंमलबजावणी बाबत आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, या योजनेसाठी अद्याप पदांची ऑनलाईन नोंदणी पोर्टलवर केली नसलेल्या शासकीय आस्थापनांनी तात्काळ नोंदणी करुन घ्यावी. आपल्या कार्यालयाच्या मंजूर आकृतीबंधाच्या 5 टक्के प्रशिक्षणार्थी 6 महिन्यांसाठी या प्रक्रियेद्वारे शासकीय कामकाजासाठी उपलब्ध करुन घ्यावेत. यासाठी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने पदे नोंदवावीत. तसेच या आठवड्याभरात प्रशिक्षणार्थींच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करुन प्रशिक्षणार्थ्यांना कार्यालयात रुजू करुन घ्यावे. या योजनेमुळे शासकीय आस्थापनांना शासकीय कामकाजासाठी मनुष्यबळ उपलब्ध होण्याबरोबरच जिल्ह्यातील युवकांना सहा महिन्यांसाठी विद्यावेतन घेवून शासकीय कामकाजाचा अनुभव मिळणार आहे. यामुळे सर्व आस्थापनांनी ऑनलाइन नोंदणीला प्राधान्य द्यावे.

जिल्ह्यात शासकीय कार्यालयाकडील 1 हजार 154 पदे आतापर्यंत पोर्टलवर नोंदवण्यात आली असून या पदांसाठी 901 युवकांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. यापैकी 27 उमेदवारांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली आहे. तर खाजगी क्षेत्रासाठी दहा उमेदवारांची निवड झाली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी बैठकीत दिली.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी करा

जिल्ह्यात ५०० हून अधिक युवकांना शासकीय कार्यालयात प्रशिक्षणाची संधी; कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा परिषदेत सर्वाधिक पदे

शिक्षणानंतर युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यात नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024 सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण यांच्यामार्फत संयुक्तपणे ही योजना राबविण्यात येत आहे.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात युवक शिक्षण घेऊन नोकरी व्यवसायाच्या शोधतात. बहुतांश जणांना अनुभव नसल्याने नोकरी मिळवण्यासाठी अडचण येते, त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे, याकरिता राज्यातील सुशिक्षित युवकांना नोकरीक्षम बनविण्यासाठी ” मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सुरु करण्यात आली आहे.
या योजनेतून सुशिक्षित बेरोजगारांना सहा महिने विद्यावेतनासह प्रशिक्षण मिळणार आहे.

१२ वी, आय.टी.आय, पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेल्यांना सहा महिने प्रशिक्षणासाह विद्यावेतन देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ५०० हून अधिक प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण घेता येणार आहेत.
12 वी उत्तीर्ण उमेदवारांना – रक्कम 6 हजार रुपये,
आयटीआय, पदविका रक्कम – 8 हजार रुपये,
पदवी – रक्कम 10 हजार रुपये या प्रमाणे विद्यावेतन मिळणार आहे.
इच्छुक प्रशिक्षणार्थीसाठी अटी खालील प्रमाणे आहेत.

  • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल वय ३५ वर्ष असावे. शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण/आय.टी.आय/पदविका/ पदवी/ पदव्युत्तर पदवी.
    उमेदवारांची आधार नोंदणी असावी. तसेच उमेदवारांचे बँक खाते आधार संलग्न असावे.
    इच्छुक उमेदवारांनी विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे व पोर्टलवरील पदांसाठी Online Apply करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०२३१ – २५४५६७७ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *