विरोधी पक्षाने घेतला जोरदार आक्षेप हा तर संविधानावरचा हल्ला म्हणत टीका!
नवी दिल्ली —- अल्पसंख्याक मंत्री किरेण रिजिजू यांनी वक्फ अमेंडमेंट बिल आज लोकसभेत सादर केलं. यानंतर वक्फ बोर्डातील नियमांच्या बदलांची तरतूद असलेल्या वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. के. सी. वेणुगोपाल यांनी या दुरुस्ती विधेयकावर आक्षेप नोंदवला आहे. संविधानाने लोकांना दिलेल्या धर्म आणि मुलभूत हक्कांवर हा थेट हल्ला आहे असं वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे. या विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु झाली आहे.
विधेयकाचा उद्देश काय आहे?
विधेयकाचा उद्देश केंद्रीय पोर्टलच्या माध्यमातून वक्फ बोर्डाच्या मालमत्ता, संपत्तीची नोंदणी करण्यात सुलभता आणण्याचा आहे. १८ फेब्रुवारी २०१४ या दिवशी हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आलं होतं.
वक्फ बोर्डाच्या विधेयकया काय काय तरतुदी आहेत?
विधेयकाचा उद्देश गरीब मुस्लिमांना न्याय देणं आणि मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क प्रदान करणं हा आहे.
रेल्वे मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यानंतर देशातील मालमत्तांच्या बाबत वक्फ बोर्डाचा तिसरा क्रमांक लागतो.
देशात ३० वक्फ बोर्ड आहेत ज्यांच्याकडे ८ लाख एकरहून अधिक मालमत्ता आहेत.*
दुरुस्ती विधेयकात केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्ड यांचं संलग्नीकरण करण्याचा प्रस्ताव आहे.
ज्यामुळे मुस्लिम महिलांना आणि बिगर मुस्लिमांनाही प्रतिनिधित्व मिळेल*
विधेयकातील तरतुदीनुसार वक्फ बोर्डाला त्यांच्या मालमत्तांमधून जे उत्पन्न मिळतं ते देणगीसाठी खर्च करावं लागणार आहे.
विधेयकात असाही प्रस्ताव आहे की जिल्हाधिकारी हे ठरवतील की कुठली मालमत्ता वक्फ बोर्डाची आहे ? ती जर सरकारी जमीन असेल तर त्यावर वक्फ बोर्डाचा हक्क नसेल.
बोहरा आणि आगाखान मुस्लिम यांच्यासाठी औकाफ बोर्ड तयार करण्यात यावं असाही प्रस्ताव विधेयकात आहे.*