पथारी धारकांचे पुनर्वसनासाठी पँथर आर्मी चे पुणे कँन्टोमेंटवर धडक मोर्चा

पथारी धारकांचे पुनर्वसनासाठी पँथर आर्मी चे पुणे कँन्टोमेंटवर धडक मोर्चा

पुणे कँन्टोमेंट बोर्डाने पथारी धारकांचे पुनर्वसन केलेच पाहिजे
फिरोज मुल्ला (सर)


पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) यांच्या नेतृत्वाखाली पथारी धारकांचे पुनर्वसन करण्यासाठी पुणे कँन्टोमेंटवर “धडक मोर्चा” काढण्यात आला.


वेस्टर्न टाँकीज मोलोदीना रोडवरील पथारी धारक गेली ३०ते३५ वर्षांपासून तेथे रस्त्याच्या कडेला छोटे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत होते परंतु पुणे कँन्टोमेंट बोर्डाकडून त्यांच्यावर सतत अतिक्रमणाची कारवाई होत असल्यामुळे गोरगरीब कष्टकरी हातावर पोट असणाऱ्या पथारी धारकांचे कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे कुटुंब संभाळणे अवघड होत आहे रोजगार नसल्यामुळे कर्जबाजारी झाले आहेत या वाढत्या महागाई मध्ये घर चालविणे खूप कठीण झाले आहे पथारी व्यवसाय सुरू नाही झाला तर भविष्यात चोऱ्या माऱ्या गुंडगिरी करून परीवाराचे पोट भरावे लागेल समाजात कष्ट करून खाणाऱ्या व्यक्ती गुन्हेगारी कडे जाण्याची लक्षणे ठरू नये किंवा ते सहपरिवार आत्महत्या करून घेतील या सर्व गंभीर प्रश्नांवर विचार करून पथारी धारकांच्या न्याय हक्कासाठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला


पुणे कँन्टोमेंट बोर्डाचे C.E.O.मा.सुब्रतो पाल यांची समक्ष भेट घेऊन त्यांच्या बरोबर वरील सर्व गंभीर प्रश्नावर चर्चा केली त्यांनी सांगितले की मि पुणे कँन्टोमेंट बोर्डाच्या मिटींगमध्ये तुमचा विषय ठेवून पुढील निर्णय देईन पथारी धारकांचे पुनर्वसन करा अस्या मागणीचे निवेदन देण्यात आले हे प्रश्न लवकरात लवकर नाही सुटले तर पथारी धारक त्यांच्या कुटुंबासहीत पुणे कँन्टोमेंट बोर्डा समोर उपोषणाला बसु असा इशारा फिरोज मुल्ला(सर)यांनी दिला
या मोर्चाचे आयोजन पुणे शहर अध्यक्ष संदीपभाऊ शेंडगे,प्रदेश सदस्य रईस खान, पुणे शहर कार्यध्यक्ष हासीम खान यांनी केले यावेळी महीला प्रदेश कार्यध्यक्षा सिंधुताई तुळवे, महीला पुणे शहर उपाध्यक्षा विजयाताई खटाळ, राजू नाईक,मुनवर खान, सलमान खान,आसिफ शेख, सरफराज शेख नसरीन शेख,संभाजी तोडकर, समीर शेख,रियाज कुरेशी,सुबान सौदागर, तरबेज शेख,समीर शेख आदी पथारी धारक कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *