आपत्ती व्यवस्थापन जनजागृती व तिरंगा मिनी मॅरेथॉन संपन्न ; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झेंडा दाखवून मिनी मॅरेथॉनची सुरुवात

आपत्ती व्यवस्थापन जनजागृती व तिरंगा मिनी मॅरेथॉन संपन्न ; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झेंडा दाखवून मिनी मॅरेथॉनची सुरुवात

आपत्ती व्यवस्थापन जनजागृती व तिरंगा मिनी मॅरेथॉन संपन्न

कोल्हापूर, दि. 9 : राज्य शासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर यांच्यामार्फत कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाविषयीची जनजागृती करण्यासाठी मिनी मॅरेथॉन तसेच हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत तिरंगा मॅरॅथॉन आज 9 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता घेण्यात आली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झेंडा दाखवून मिनी मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली.

 ही रन जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथून सकाळी 7.15 दरम्यान वाजता सुरु होऊन धैर्यप्रसाद मंगल कार्यालय चौकापर्यंत जाऊन परत जिल्हाधिकारी कार्यालय असे साधारण 2.5 किलोमीटर अंतराची होती. 15 ऑगस्ट पर्यंत हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार असून या अभियानात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

या मिनी मॅरेथॉन मध्ये अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राकेशकुमार मुदगल, तहसीलदार सैपन नदाफ, नायब तहसीलदार नितीन धापसे- पाटील, कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण तसेच त्यांचे सहकारी, शहरातील एनसीसी, एनएसएस चे युवक, युवती, आपत्ती व्यवस्थापनात कार्यरत स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक सहभागी झाले.

यावेळी तहसीलदार वनिता पवार, माहिती अधिकारी वृषाली पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच अन्य विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *