बेडकिहाळ प्रतिनिधी- डॉ विक्रम शिंगाडे
बेडकिहाळ येथील साहित्य,संस्कृती, शेती सोशल फाउंडेशनच्या वतीने दि 7 रोजी देशभक्त रत्नाप्पान्ना कुंभार सभागृह येथे महापुर नियंत्रणासाठी नदीकाठावरील लोकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
महापुर नियंत्रण मेळावा बैठकीचे उद्घाटन प्रा. डी. एन दाभाडे, गुरुदत्त शुगर कारखाना टाकळीवाडी संचालक बाळासाहेब पाटील, क्रुषीतज्ञ सुरेश देसाई, सर्जेराव पाटील,अभय व्हनगोंडा, बबन चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.
या मेळाव्यामध्ये महापुर नियंत्रण करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे. या बद्दल चर्चा करण्यात आली. गेल्या वीस-तीस वर्षांचे अवलोकन केल्यास अलीकडील काळातच महापुराने नदीकाठावरील लोक मोठ्या प्रमाणात संकटात सापडत आहेत. सतत येत असलेल्या पुरामागे अनेक कारणे आहेत. पुराला आपणासह शासनही जबाबदार आहे. यासाठी नदीकाठावरील शेतकरी संघटित होणे गरजेचे आहे, असा निर्धार नदीकाठावरील शेतकऱ्यांनी व्यक्त केला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी फाऊंडेशनचे अध्यक्ष व सेवानिवृत्त प्रा. डी. एन. दाभाडे होते.
सुरेश देसाई यांनी बऱ्याच वर्षांपासून पूरबाधित शेतकऱ्यांच्या समस्येचा आढावा घेतला. सांगलीचे सर्जेराव पाटील म्हणाले, बऱ्याच दिवसांपासून पूरबाधित शेतकऱ्यांच्या समस्या व सांगलीला ग्रासलेल्या पुराबाबत आमचे म्हणणे कर्नाटक-महाराष्ट्राच्या पूर नियंत्रण अधिकाऱ्यांसमोर मांडले आहे. प्रत्यक्ष धरण परिसरात जाऊन माहिती दिली आहे.अजूनही पुराचे ग्रहण सुटलेले नाही. अध्यक्ष प्रा. डी. एन. दाभाडे म्हणाले की
नदीकाठावरील नागरिकांनी एकत्र येऊन शासनासमोर हा प्रश्न मांडुन महापुर नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.यासाठी क्रुती समितीची स्थापना करु, गावागावांतून समिती करू. असे ते म्हणाले.
दानवाडचे कुमार तिप्पान्नावर, विजय दिवाण यांनीही मनोगत व्यक्त केले.
तसेच अनेक शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कोगनोळीचे प्रकाश कदम, तात्यासाहेब केस्ते, संजय कोरे यांच्यासह भोज, सदलगा,नेज, बोरगाव,कारदगा,दत्तवाड,
मांजरी, कल्लोळ, अब्दुललाट, घोसरवाड, हेरवाड, दत्तवाड जनवाड, शिरदवाड, मलिकवाड, परिसरातील नागरिक उपस्थित होते. प्रमोदकुमार पाटील यांनी आभार मानले.