नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारींचे जलद गतीने निवारण होण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर प्रभावीपणे काम करा -जिल्हाधिकारी अमोल येडगे*

नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारींचे जलद गतीने निवारण होण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर प्रभावीपणे काम करा -जिल्हाधिकारी अमोल येडगे*

नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारींचे जलद गतीने निवारण होण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर प्रभावीपणे काम करा

 *-जिल्हाधिकारी अमोल येडगे*
  • शासकीय कामकाज होणार अधिक पारदर्शक
  • नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारींचे होणार निराकरण
  • सर्व विभागांनी योगदान द्यावे

कोल्हापूर, दि.13नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारा आपले सरकार 2.0″ हा शासनाचा महत्वपुर्ण प्रकल्प आहे. नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारींचे जलद गतीने निवारण होण्यासाठी सर्व विभागांनी योगदान देवून आपले सरकार पोर्टलवर प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

 नागरिकांच्या ऑनलाईन पध्दतीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठीचे आपले सरकार पोर्टलची कोल्हापूर जिल्ह्यात  प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी व या पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींचा 100 टक्के निपटारा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नूतन सभागृहात विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यात ई-गव्हर्नन्स तज्ज्ञ देवांग दवे व सिल्वर टच एजन्सीचे समीर काळे यांनी आपले सरकार प्लॅटफॉर्मच्या कार्यक्षम वापराबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, हर्षल मंत्री, विनोद वर्मा, शुभम पै, निलेश पटेल, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, आपले सरकार पोर्टल द्वारे शासनाच्या प्रत्येक विभागाविषयीची तक्रार नागरिक ऑनलाईन पद्धतीने दाखल करणार असून या तक्रारीवर केलेली कार्यवाही, प्रलंबित अर्ज व सुरु असलेली कार्यवाही याबाबतची माहिती पोर्टलवर सर्वांना दिसणार असल्यामुळे शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येईल व नागरिकांची गैरसोय टळेल. त्यामुळे हे पोर्टल अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी खुप उपयुक्त ठरेल.

शासनाच्या विविध सेवांचे वितरण योग्य पद्धतीने आणि कमी वेळेत होण्यासाठी सेवा हमी कायद्याची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. सेवा हमी कायद्यांतर्गत पथदर्शी प्रकल्पात कोल्हापूर जिल्ह्याची निवड झाली आहे. या प्रकल्पाचा 15 ऑगस्ट पासून कोल्हापूर जिल्ह्यात शुभारंभ होणार असून हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन करुन सेवा हमी कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या विविध सेवांची माहितीही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी दिली.

यावेळी उपस्थित सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपले सरकार पोर्टलबाबत सर्व तांत्रिक माहिती देवून सर्व शासकीय विभागांनी या पोर्टलचा प्रभावीपणे वापर करावा. तसेच नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारींचे जलद निपटारा करावा, जेणेकरून आपापल्या विभागाचे, जिल्ह्याचे काम सर्वांना दिसून येईल, असे आवाहन ई-गव्हर्नन्स तज्ज्ञ देवांग दवे यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *