वंचित ” च्या दणक्याने झेड पी ॲक्शन मोडवर..शिरदवाड ग्रामपंचायत मधील 92 लाखाच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी दोषी व्यक्तीवर कडक कारवाई व रक्कम वसुली करण्याचे जिल्हा परिषदेचे आदेश.

वंचित ” च्या दणक्याने झेड पी ॲक्शन मोडवर..शिरदवाड ग्रामपंचायत मधील 92 लाखाच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी दोषी व्यक्तीवर कडक कारवाई व रक्कम वसुली करण्याचे जिल्हा परिषदेचे आदेश.

” वंचित ” च्या दणक्याने झेड पी ॲक्शन मोडवर..

शिरदवाड ग्रामपंचायत मधील 92 लाखाच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी दोषी व्यक्तीवर कडक कारवाई व रक्कम वसुली करण्याचे जिल्हा परिषदेचे आदेश.


कोल्हापूर – ( दि 16/08 ) प्रतिनिधी.
शिरदवाड ग्रामपंचायत मध्ये झालेल्या लाखो रुपयाच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी दोषी वर कडक कारवाई व संबधीत कर्मचाऱ्यांकडून पैशाची वसुली किंवा त्याच्या सातबारा,प्रॉपर्टी वर महसुली नोंद करण्याचा लेखी आदेश जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी ( ग्रा. प.) अरुण जाधव यांनी आज वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सुरू असलेल्या उपोषण स्थळी आंदोलक कार्यकर्त्यांना दिली.
ग्रामपंचायत मध्ये 2020 – 21 पासून झालेल्या विकास कामात अनियमितता व भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव व ग्रा प सदस्य महादेव कुंभार यांनी दिली होती.चौकशीस विलंब झाल्यास जिल्हा परिषदे समोर दि.15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ही दिला होता.
त्यानुसार आज स. 8.30 वाजता जिल्हा परिषदेच्या समोर महादेव कुंभार व वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी यांनी उपोषणास सुरुवात केली. ग्रामपंचायत मधील कारभार व अधिकारी यांच्या निष्क्रियते बाबत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल करून ग्रामपंचायत मध्ये चालू असलेल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला होता. लेखा परीक्षकांच्या आर्थिक तपासणी अहवालात ग्राम पंचायतीच्या कामकाजात 92 लाखाची अनियमितता झाली असल्याचे म्हटले आहे. त्याचा आधार घेत कुंभार यांनी ग्राम विस्तार अधिकारी अतुल इरनक यांच्या विरोधात ते कामावर रुजू झाल्यापासून त्यांच्या कामकाजात अनियमितता दिसत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गावामधील अंतर्गत रस्ते व गटार बांधकाम पूर्ण झाले व पेमेंट ही अदा केले आहे मात्र रस्ते गायब आहेत. खेळाचे साहित्य खरेदी केल्याच्या नोंदी सापडतात पण साहित्य खरेदी केले नाहीत.या व अन्य बऱ्याच कामामध्ये भोगस व बनावट गिरी झाली असल्याचे पुढे आले आहे.
या बाबत वंचित बहुजन आघाडी च्या वतीने महादेव कुंभार यांनी गेली दीड-दोन वर्षे झाले तक्रारी दाखल केल्या आहेत व वेळोवेळी आंदोलनाचा ही इशारा दिला होता.पण वरिष्ठ अधिकारी या वर पांगरून घालण्याचा प्रयत्न करीत होते. त्या मुळे वंचित बहुजन आघाडीला उपोषणाला सामोरे जावे लागले.
या वेळी महादेव कुंभार यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, करवीर तालुका अध्यक्ष भिमराव गोंधळी, जिल्हा कोषाध्यक्ष विकास बाचने, जिल्हा सचिव विश्वास फरांडे,जिल्हा सचिव मा.तानाजी काळे, शिरोळ तालुका उपाध्यक्ष उदय कांबळे, शिरोळ तालुका महासचिव रमेश कांबळे, शिरदवाड शाखा उपाध्यक्ष कुमार आवळे, शिरदवाड शाखेचे आयटी प्रमूख प्रमोद कांबळे कार्यकर्ते लखन कांबळे शिवाजी कांबळे, रवि चव्हाण,आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *