
मेहकर विधानसभेतील जनतेच्या व युवकांच्या मनात संदिप गवई यांच्या नावांची चर्चा
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडुन प्रबळ दावेदार..!
उमेदवारी मिळाल्यास विजश्री खेचुन आणणार..
बुलढाणा मेहकर :- बुलढाणा जिल्हात नव्हे तर आख्या महाराष्ट्रात दांडगा जनसंपर्क आसणारे नेहमी गोरगरिबांच्या सुखा दुखात सहभागी आसणारे मेहकर मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडुन उमेदवारी दिल्यास लाखाधिक्याच्या मताने संदिप गवई बाजी मारू शकतात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणूकी नंतर ऑक्टोबर महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामध्येच मेहकर व लोणार विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दरम्यान मतदारसंघात आयात उमेदवारांची संख्या जास्त प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. बुलढाणा लोकसभेमध्ये महाविकास आघाडी कडून नरेंद्र खेडेकर साहेब यांना उमेदवारी देण्यात आली होती परंतु त्यांना महायुती समोर अपयश आले त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांमध्ये व युवकांमध्ये आक्रोश पाहायला मिळाला आहे त्याच माध्यमातून लाखाधिक्य मताने संदिप गवई यांना मेहकर लोणार विधानसभेमध्ये निवडून येण्यासाठी तथागत ग्रुपच्या कार्यकर्त्यानी व नागरिकांनी तसेच युवकांनी निवडणूक हाती घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामध्येच राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षा तर्फे संदिप गवई यांना उमेदवारी देण्यात आली तर त्यांचा विजय मात्र निश्चित असल्याचे बोलल्या जात आहे. सध्याच्या स्थितीमध्ये मेहकर लोणार विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरील मतदारसंघातील उमेदवार इच्छुक असून “बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना” ही म्हण तंतोतंत खरी होताना दिसत आहे परिणामी नागरिकांनमध्ये निराशाजन्य वातावरण आहे आणि “अब की बार स्थानिक आमदार” असा नाराच जणू मतदारांनी लावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मेहकर लोणार मतदारसंघामध्ये स्थानिक उमेदवार म्हणून एका गरीब व सर्व सामान्य कुटुंबातील, कुठला ही राजकिय वारसा न लाभलेले जनतेच्या व युवकांच्या मनातील युवा तरुण तडफदार नेतृत्व म्हणून तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई हे प्रत्येकांच्या मनात असून गोर-गरीब, शेतकरी-शेतमजुर, कष्टकरी, बेरोजगार युवकांच्या प्रगतीच्या व मतदासंघाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मतदारांच्या आशा पल्लवित झाल्या असुन सर्व सामान्य जनता येणारी निवडणुक डोक्यावर घेणार असल्याचे चित्र आहे. त्यामूळे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्या रूपाने चांगल्या मताधिक्याने मेहकर लोणार विधानसभेत विजयाची बाजी मारण्याची शक्यता नाकारता येणार नाही.