संविधान जागर साहित्य संमेलनाचे प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन !
औरंगाबाद( छ. संभाजी नगर) येथील संविधान जागर साहित्य संमेलनाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या, प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका वाचून संमेलनाची सुरुवात करण्यात आली. या संमेलनाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.