बाचणी विद्यामंदिर प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन संपन्न
कोल्हापूर,दि. २९ (प्रतिनिधी) करवीर तालुक्यातील बाचणी येथील जिल्हा परिषदेच्या बाचणी विद्यामंदिर प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही यंत्रणे चे उद्घाटन करण्यात आले. विद्या मंदिर शाळेचे माजी विद्यार्थी उत्तम आनंदा जगताप व मनीषा उत्तम जगताप या मुंबई पोलीस सेवेतील दाम्पत्याने शाळेला सीसीटीव्ही संच भेट दिला. त्यांच्याच हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक आक्सर शिकलगार, शाळा व्यवस्थापन समितीचे शशिकांत कारंडे यांच्या हस्ते जगताप दांपत्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दत्तात्रय रेडेकर, मच्छिंद्र साळवी, रणजीत परीट, रणजीत साळवी, संदीप पाटील, पंढरीनाथ कारंडे, अजित पाटील शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नकुशी देवकर प्रास्ताविक आनंद पाटील व आभार सागर पाटील यांनी मानले.