मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नोंदीत बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी दहा हजार रुपये बोनस द्या! व इतर मागण्यांच्यासाठी मुंबई आझाद मैदानावर हजारो बांधकाम कामगारांचा 8 ऑक्टोबर रोजी धडक मोर्चा!
महाराष्ट्रामध्ये सध्या नोंदीत बांधकाम कामगारांची संख्या 18 लाखापेक्षा जास्त आहे. दुसऱ्या बाजूस फक्त बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी उपकर लागू करण्यात आलेला असून या उपकारामधून बिल्डर व इमारत बांधकाम कामगार व्यवसायांच्याकडून शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सध्या 20000 कोटी पेक्षा जास्त रक्कम शिल्लक आहे.
तरीही कल्याणकारी योजनांचे विविध 29 लाभ देण्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाला पूर्णपणे अपयश आलेले आहे.
निवारा बांधकाम कामगार संघटना व इतर काही कामगार संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांना बोनस मिळण्यासाठी केस दाखल केलेली होती (रीट पिटिशन क्रमांक १०२७/ २०२१.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून म्हणजेच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना बोनस द्यावा असे शिष्टमंडळाच्या वतीने कामगार मंत्री यांना निवेदन देऊन एक महिन्यांपूर्वी मागणी करण्यात आली.सुरुवातीस कामगार मंत्री श्री सुरेश भाऊ खाडे यांनी याबद्दल निर्णय करून असे आश्वासन दिले. परंतु प्रत्यक्षात मात्र आठ दिवसानंतर तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या कामगार मंत्र्यांनी बोनसच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आमच्यावर नाही असे कामगार मंत्र्यांनी याबाबत हात झटकण्याचा प्रयत्न केलेला आहे.हे बांधकाम कामगारांच्या वर अन्याय करणार कृती आहे.
म्हणूनच या अन्याय विरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी हजारोंच्या संख्येने मुंबई आझाद मैदानावर धडक मोर्चा काढण्याचे ठरवण्यात आले असून ही घोषणा सांगली निवारा बांधकाम कामगार संघटनांनी सांगली दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहांमध्ये हजारो कामगारांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये सध्या बांधकाम कामगारांना भांड्याचे साहित्य वाटप व सुरक्षा संच वाटप हेच सुरू असून याबद्दल कंत्राटदारांचे भले चालू असून कंत्राटदारांच्या भल्यासाठी बाकीच्या सर्व योजना सध्या या कल्याणकारी मंडळाने बंद ठेवलेल्या असून वर्ष संपत आले तरीसुद्धा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला तर अंत्यविधीची रक्कम त्या कामगाराचे वार्षिक साध्य झाले तरीसुद्धा मिळत नाही. बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहस आर्थिक मदत मिळत नाही अशी सर्व स्थिती आहे.या सर्वच अन्याविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आझाद मैदान मध्ये प्रचंड मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या मोर्चासाठी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कामगारांनी मुंबई आझाद मैदान येथे सकाळी दहा वाजेपर्यंत उपस्थित रहावे असे आवाहन करणारे पत्रक निवारा बांधकाम कामगार संघटनेचे सचिव कॉ विशाल बडवे यांनी प्रसिद्धीस दिलेले आहे.
सांगली दीनानाथ मंगेशकर नाट्यग्रहा मध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये सलीम इनामदार, संतोष बेलदार , बाळासाहेब वसगडेकर , शुभांगी गावडे, विजय पाटील, शांताबाई चव्हाण अर्चना बेलंकी,शाबिदा शेरकर पांडुरंग मंडले, मोहन जाविर, चंद्रकांत वाघमारे, रोहिणी खोत, स्वालिया सौदागर इत्यादींनी बांधकाम कामगारांच्या विषयी भूमिका मांडल्या. शेवटी निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या जनरल सेक्रेटरी प्रा शरयू बडवे यांनी आभार मानल्यानंतर मेळावा समाप्त झाला.
Posted inसांगली
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नोंदीत बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी दहा हजार रुपये बोनस द्या! व इतर मागण्यांच्यासाठी मुंबई आझाद मैदानावर हजारो बांधकाम कामगारांचा 8 ऑक्टोबर रोजी धडक मोर्चा!
