अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आजपासून बौद्ध समाज संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे. अकोल्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही यात्रा सुरू झाली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील दताळ आणि घुंगशी या ठिकाणी यात्रा पोहचली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक सोनोने, राजेंद्र पातोडे, मिलिंद इंगळे यांनी दताळ आणि घूंगशी येथील उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आणि सध्या सत्ताधारी तसेच प्रस्थापित आरक्षणाच्या मुद्द्यावर कशा प्रकारे राजकारण करत आहेत याबाबत जागृती केली. यामुळे आपले आरक्षण धोक्यात आणणारे निर्णय सत्ताधारी घेत असल्याचे त्यांनी नागरिकांना सांगितले.