एक्साईज कागल विभागाकडून गावठी दारू वाहतुक व निर्मिती केंद्रावर धडक कारवाई तिघांना अटक
कोल्हापूर,दि.५ (प्रतिनिधी) भुदरगड तालुक्यातील देवकेवाडीत रामचंद्र मोकाशे यांच्या घरासमोर सापळा रचून केलेल्या कारवाईत आरोपी भरत शामराव बांदेकर वय २७ रा. इंगळे रोड, न्यू राजापूर, पट्टणकोडोली ता. हातकणंगले जि. कोल्हापूर व त्याचा साथीदार महेश महादेव सावंत रा. देवकेवाडी ता. भुदरगड, जि. कोल्हापूर यांनी गावठी दारूचा साठा हिरो होंडा क्र. MH-09-BV-3831 या दुचाकीवरून जात असताना मिळून आले. घटनास्थळी व आरोपी यांच्या ताब्यातून गावठी दारू-२५० लिटर, दोन मोबाईल व दुचाकीसह असा एकुण ९३,५०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींना गावठी दारू साठयाबाबत विचारणा केली असता गावठी दारूचा साठा व दुचाकी सुनिल दत्तात्रय सावंत रा. देवकेवाडी ता. भुदरगड, जि. कोल्हापूर याच्या मालकीचा होती. तसेच हातभट्टी निर्मिती केंद्र येथून देवकेवाडीच्या पश्चिमेस ४ किलोमीटर गिरगावच्या हद्दीत असल्याचे ठिकाण दाखवले. भरत शामराव बांदेकर याच्याकडून सुनिल दत्तात्रय सावंत याचा मोबाईल नंबर घेऊन सुनिल दत्तात्रय सावंत यास घटनास्थळी बोलवून त्याला याबाबत विचारणा केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. व आरोपी १ ते ३ यांना घेऊन हातभट्टी निर्मिती केंद्राच्या ठिकाणी हातभट्टी निर्मिती साठी उपयोगात येणारे कच्चे रसायन तसेच इतर साहित्य मिळून आले. या ठिकाणी जळके रसायन ५०० लिटर, कच्चे रसायन १०० लिटर, १९ मोबाईल तसेच इतर साहित्य असा एकूण २८२०० किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. गुन्हा स्थळ- १ व गुन्हा स्थळ-२ या ठिकाणी मिळून आलेले गावठी दारू-२५० लिटर, जळके रसायन-५०० लिटर, कच्चे रसायन १०० लिटर, एकूण ३ मोबाईल व १ दुचाकी असा एकूण १,२९,७०० किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने जागीच जप्त करून रसायन व गावठी दारूचा साठा नाश करण्यात आला. हातभट्टी निर्मिती साठी लागणारा काळा गुळाविषयी व लाकडाविषयी विचारणा केली असता सुनिल दतात्रय सावंत याने काळा गुळाचा पुरवठा श्री. मांडेकर रा. गडहिग्लज मार्केट हा करीत असून लाकडे एका अनोळखीकडून खरेदी केल्याची कबुली दिली. या गुन्हयातील मुख्य आरोपी सुनिल दतात्रय सावंत, भरत शामराव बांदेकर व महेश महादेव सावंत यांना ताब्यात घेऊन जबाब नोंद करून चौकशी अंतर्गत गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील तपासकामी अटक केली आहे. तसेच काळा गुळ पुरविणारा श्री. मांडेकर रा. गडहिग्लज मार्केट व लाकूड पुरवणारा अज्ञात यांना या गुन्ह्यात फरार घोषित करून आरोपी भरत शामराव बांदेकर, महेश महादेव सावंत, सुनिल दत्तात्रय सावंत यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदानुसार गुन्हा नोंद केला आहे. फरार आरोपींचा शोध चालू आहे.
या गुन्ह्यातील अटक आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गारगोटी कोर्ट ता. भूदरगड जिल्हा कोल्हापूर यांच्या समोर हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपींना २ दिवस पोलीस कोठडी दिली.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या आदेशाने अंमलबजावणी व दक्षता संचालक प्रसाद सुर्वे, कोल्हापूर विभागीय उपआयुक्त व्ही. पी. चिंचाळकर ,कोल्हापूर अधीक्षक श्रीमती स्नेहलता नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एक्साईज कागल निरीक्षक शंकर आंबेरकर यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक पी. व्ही. नागरगोजे यांनी केली असून दिनकर गवळी , सचिन काळेल, अमर पाटील, बलराम पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.
या गुन्हाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक पी. व्ही. नागरगोजे
करत आहेत आरोपींचा जामीन न्यायालयाने नामंजूर केला.
असून, आरोपी कळंबा जेल मध्ये आहेत.