आत्मसन्मान गौरव पुरस्कार आणि नारीशक्ती गौरव पुरस्कार वितरण सोहळा वसई येथे संपन्न

आत्मसन्मान गौरव पुरस्कार आणि नारीशक्ती गौरव पुरस्कार वितरण सोहळा वसई येथे संपन्न


वसई (पालघर) : जनहित फाउंडेशन महाराष्ट्र आणि संघर्षनायक मीडिया यांच्या सहयोगाने पालघर,ठाणे,आणि मुंबई जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय समाज कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचा आणि व्यक्तींचा राज्यस्तरीय संघर्षनायक मीडिया २०२४ आत्मसन्मान गौरव पुरस्कार आणि नारीशक्ती गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. या पुरस्कार कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन जनहित फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेने केले.या संस्थेच्या महासचिव श्रीमती. शहीदा शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.संस्थेचे सचिव श्री.महेंद्र वाघमारे,उपाध्यक्ष श्रीमती सुनीता कश्यप,तसेच नवनिर्वाचित सदस्य सौ.विजया रूखे यांनी मोलाची कामगिरी पार पाडून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून मा.डॉ.ऋजूता ओमप्रकाश दुबे ,विश्वस्त व स्त्री रोग प्रसूती तंत्र विभाग प्रमुख,आयुर्वेद मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय नालासोपारा उपस्थित होत्या.तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.संतोष एस.आठवले संपादक,संघर्षनायक मीडिया व राष्ट्रीय अध्यक्ष,पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना, ज्येष्ट समाजसेवक मा.श्री.गंगाधर म्हात्रे,समाजसेवक मा. ॲड. निलेश राऊत आणि जनहित फाउंडेशन महाराष्ट्र चे अध्यक्ष पत्रकार मा.श्री.उमेश जामसंडेकर हेही याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

या प्रसंगी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना अध्यक्ष मां.श्री.संतोष आठवले यांनी पालघर जिल्हा प्रमुख म्हणून श्री.जितेंद्र शिरसाट यांची तर,पालघर जिल्हा महिला प्रमुख म्हणून सौ. विजया रूखे यांची पत्र देवून नियुक्तीची घोषणा केली.

कार्यक्रमास संबोधन करताना जनहित फाउंडेशन महाराष्ट्र अध्यक्ष मां.श्री.उमेश जामसंडेकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत व अभिनंदन केले.यावेळी बोलताना त्यांनी सर्व संस्थांनी आणि सन्मानित प्रमुखांनी आपलं ध्येय गाठताना आणि समाजाला न्याय मिळवून देताना समाजाचं नुकसान होईल अशी तडजोड न करता निस्वार्थी पणें एकत्रित येवून काम करावं असे मत मांडले.

प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.आठवले यांनी जमलेल्या सन्मानित व्यक्तींनी समाजासाठी काम करीत असताना पीडित तसेच भूमिहीन समाजाकडे लक्ष देवून राज्य आणि देश उभारणीत मोलाचा वाटा उचलण्याची गरज आहे असे विचार मांडले.तसेच सर्व महान व्यक्तींनी एकत्रित येवून प्रश्न सोडवण्याची विनंती केली.सामाजिक कार्यकर्ते मां.ॲड.निलेश राऊत यांनी पुरस्कार मिळालेल्या सर्व मान्यवर व्यक्तीचे अभिनंदन करून भविष्यात एकमेकांना मदत करून सामाजिक प्रश्न सोडविण्याचे व स्वतः त्यासाठी वेळ देण्याचं आश्वासन दिले.

ज्येष्ट समाजसेवक मां.श्री.गंगाधर म्हात्रे यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक सन्मानित व्यक्तींनी आपली सहमती दर्शवली.आलेल्या पाहुण्यांचे आणि सन्मानित व्यक्तींचे जनहित फाउंडेशन आणि पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांच्यातर्फे आभार मानले गेले आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देवून राष्ट्र गीताने कार्यक्रमाची यशस्वी सांगता पार पडली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *