
महाराष्ट्र राज्यातील 19 लाख नोंदीत बांधकाम कामगराना दिवाळीपूर्वी प्रत्येकी दहा हजार रुपये बोनस मिळावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. या मागणी संदर्भात बोलताना बांधकाम कामगार संघटनेचे निमंत्रक कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की. निवारा बांधकाम कामगार संघटना व इतर कामगार संघटना यांनी सन 2021 मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये बोनस मिळण्यासाठी केस दाखल केलेली होती . बांधकाम कामगारांना बोनस देण्याबाबत उच्च न्यायालयामार्फत सहा महिन्यात शासनाने निर्णय करावा असा आदेश देण्यात आलेला होता.
मुंबई आझाद मैदान येथे बांधकाम कामगारांची 8 ऑक्टोबर रोजी जोरदार निदर्शने सुरू असताना शिष्टमंडळाच्या वतीने प्रधान सचिव श्री विनिता सिंगल यांच्याशी चर्चा झाली.
चर्चेमध्ये कॉ शंकर पुजारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत प्रधान सचिव यांना दिल्यानंतर विनिता सिंगल यांनी असे आश्वासन दिले की याबद्दल निर्णय करू.
शिष्टमंडळाच्या वतीने बोलताना कामगार नेते साथी सागर तायडे यांनी मुद्दा मांडला की ज्या जिल्ह्यांच्या मध्ये ऑनलाईन काम बंद आहे ते पूर्ववत सर्व ठिकाणी सुरू व्हावे याबाबतही निर्णय करू असे त्यांनी आश्वासन दिले.
कामगार विभागाच्या प्रधान सचिव यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली . त्यामूळे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या मागण्याची पूर्तता न झाल्यास आणखीन आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉ शंकर पुजारी, साथी सागर तायडे, साथी सुरेश पाटील, जयसिंग रणदिवे, नंदकुमार महाडिक, दीपक थोरात, काशिनाथ नकाते, मंगेश कांबळे, विशाल बडवे, संतोष बेलदार ,सलीम इनामदार, शुभांगी गावडे, शाकीरा शेरकर, रणधीर लोंढे इत्यादींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.